शिक्षण घेत असतांना यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शनासोबत सातत्याची गरज आहे तेव्हा मानवी जीवन संस्कारमय होतो असे प्रतिपादन करिअर कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री संकेत भोयर वित्त व नियोजन विभाग जि.प. गडचिरोली यांनी केले.
दि.19/09/2024 पासून आरमोरी तालुक्यामध्ये डायट गडचिरोली,गट साधन केंद्र आरमोरी व संकल्प फॉउंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दि. 25/09/2024 ला हितकारिणी माध्य. तथा उच्च माध्य विद्यालय आरमोरी येथे वर्ग 11 व 12 विच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य मा. फुलझेले, प्रमुख मार्गदर्शक मा. संकेत भोयर, मा. निखिल मोटघरे संकल्प फॉउंडेशन गडचिरोली, कु. सुनंदा गिरीपुंजे विषय साधन व्यक्ती आरमोरी उपस्थित होते.
संकल्प फॉउंडेशन गडचिरोलीचे मा. निखिल मोटघरे यांनी विद्यार्थ्यांना 12 वी नंतर काय यावर डिजिटल माध्यमातून विविध विषयाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. कु. शेंडे प्रास्ताविक विषय साधन व्यक्ती कु. सुनंदा गिरीपूजे, आभार प्रा. प्रीतम सेलोकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.