आज ब्रह्मपुरी वडसा मार्गावर सकाळच्या सुमारास वडसा येथील कोर्टात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या इसमाचा सुरबोडीजवळ झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. पंकज दशसहस्त्र वय 40 राह.पटेलनगर ब्रम्हपुरी असे मृतकाचे नाव आहे.
पंकज दशसहस्त्र हे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील कोर्टात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे.ते आज सकाळच्या सुमारास कोर्टात कार्यालयीन कामाकरीता जात असताना ब्रह्मपुरी वडसा मार्गावरील सुरबोडी जवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने पंकज दशसहस्त्र यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.