कारंजा : श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या, राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलनाच्या शुभारंभाचा सन्मान कारंजा येथील, श्री गुरूदेव सेवाश्रम मोझरीचे आजिवन प्रचारक, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांना देण्यात आला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, केन्द्रशासन तथा राज्यशासन मान्यता प्राप्त, मदत सामाजिक संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉ.प्रा. प्रकाश सोनक तथा संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे यांनी राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक गिरीश पांडव यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख अतिथी लॉन्गमार्च प्रणेते विधान परिषदेचे माजी सदस्य जोगेन्द्र कवाडे , विधान परिषद सदस्य आ.ऍड. अभिजित वंजारी, प्रमुख पाहूणे नाळ चित्रपटाच्या अभिनेत्री तक्षशिला वाघधरे, सुप्रसिद्ध उद्योजक इंजि. रूपराज गौरी तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम सभागृहामध्ये भव्य असे "सामाजिक कार्यकर्ता संमेलन" घेतले होते. या संमेलनाचा शुभारंभ, संजय कडोळे यांचे हस्ते राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून करण्यात आला . शुभारंभचा हा सन्मान कारंजा येथील दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांना अचानकपणे देण्यात आल्याने वाशिम जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते तथा पुरस्कारार्थी यांच्या द्वारे आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी नागपूर येथील सेवानिवृत्त न्यायाधिश नरेश बन्सोड, संविधान परिवाराचे प्रा . राहूल मून, माजी नगरसेवक मनोज साबळे, सुभाष भोयर, मनोज , मदत सामाजिक संस्थेचे संचालक प्रा डॉ प्रकाश सोनक, सचिव दिनेश बाबू वाघमारे, सौ रेखताई थूल, नरेश खडसे, अरुण फुलझेले, ईश्वर मेश्राम, जितेन्द्र बोरकर, दामु धनविजय, त्रिशरण पाटील, मुकूंद धनमोगरे , वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सौ सिमाताई सातपुते, से.नि. मुख्याध्यापिका सौ चंदाताई माने, माजी नगरसेविक सौ. चंदाताई कोळकर, प्रशिक नागरी सह पत संस्थेच्या सौ. आशाताई राऊत, विजय खंडार, शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे, खेर्डा काळीचे माजी सरपंच प्रदिप वानखडे, रोमिल लाठीया, ऍड. संदेश जिंतुरकर, श्रीमदभागवतकार हभप अजाब महाराज ढळे, अभा नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य नंदकिशोर कव्हळकर, पत्रकार किरण क्षार, पत्रकार सुनिल फुलारी, गोपिनाथ डेंडूळे, सुनिल गुंठेवार, उमेश अनासाने, दामोदर जोंधळेकर इ.उपस्थित याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे आजिवन प्रचारक विजय खंडार यांनी आयोजकांचे आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....