चंद्रपूर येथील मुख्य पोस्ट कार्यालयातून 35 बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात 3 आरोपीला ताब्यात घेऊन युपीएस यंत्रणेच्या एकूण 19 एसएमएफ 42 एएच बॅटऱ्या हस्तगत केल्या आहे. प्रधान डाकघर चंद्रपूर येथील युपीएस यंत्रणेच्या एकूण 35 एसएमएफ 42 एएच बॅटऱ्या दुपारी 12 वाजता कार्यालयातून अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची तक्रार रामनगर पोलिसात करण्यात आली. याअंतर्गत पोलिसांनी भादंव 379, 34 कलमान्वये गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे सोपविला. विशेष पथके तयार करून 8 जून रोजी रेकॉर्डवरील शुभम अमर समुद (26), करण मुन्ना समुंद (26), सनी अनिल किनवरिया ( 27 ), तिन्ही रा. पंचशील चौक घुटकाला यांना ताब्यात घेऊन त्यांनी झुडपात लपवून ठेवलेले विविध कंपनीच्या 19 बॅटऱ्या (72, 810 रुपये) हस्तगत करण्यात आला. चोरट्यांनी चोरीची कबुली दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. महेश कोंडावारयांच्या नेतृत्वात जितेंद्र बोबडे, विनोद भुरले, संजय आतकुलवार आदींनी केली.