कारंजा (लाड) : तृतियपंथीयाना मुख्य प्रवाहात आणणे.हे समाजाचे आणि शासनाचे कर्तव्य आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाने महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये तृतियपंथीयासाठी प्रत्येक गावात एक जागा राखीव ठेवण्याची मागणी कारंजा येथील तृतियपंथी श्रावणी हिंगासपूरे यांनी केली आहे.त्यांनी सांगितले की प्रत्यक्ष परमेश्वरानेच आम्हाला तृतियपंथी म्हणून जन्माला घातले.तरीदेखील आम्ही आम्हाला ठेवले त्या अवस्थेत जीवन जगत असतांना सामान्य व्यक्तींपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात,सातत्याने समाजसेवा करीत असतो. त्यामुळे आमची ही समाजसेवा लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत एखादी जागा आमच्या तृतिय पंथीयांसाठी राखीव ठेवावी.अशी मागणी कारंजाची तृतियपंथी श्रावणी हिंगासपूरे यांनी केली आहे. त्यामुळे एकप्रकारे निवडणूक लढविण्याचा मानसच श्रावणी हिंगासपूरे यांनी प्रगट करून दाखवीला आहे.श्रावणी हिंगासपूरे यांचे सामाजिक कार्य प्रशंसनीय असून त्यांनी निवडणूकीत उडी घेतल्यास हमखास निवडून येईल अशी त्यांची जमेची बाजू असल्याचे बोलल्या जात आहे.