कारंजाच्या बँकींग क्षेत्रातील प्रशिक पतसंस्था ग्राहकांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार. -संचालक प्रशांत पाटील काळे.
कारंजा (लाड) : नुकत्याच पार पडलेल्या प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेवर,दणदणीत मताधिक्याने संचालक म्हणून निवडून आलेले सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील काळे यांचा स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून भव्य सत्कार करण्यात आला, या संदर्भात अधिक वृत्त असे,श्री.गुरुदेव सेवा मंडळ वाशीम जिल्हा प्रचारक ह.भ. प. श्रीकृष्ण पाटील नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली,प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कारंजा शहरातील माजी पहिले शहर शिवसेना प्रमुख 'अंकल' उपाख्य सुरजितसिंगजी भाटीया यांच्या उपस्थितीत विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,श्री गुरुदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणरावजी इंगळे मंगरूळपिर,कचरूजी आटपाटकर,खासदार माननिय श्री.संजयभाऊ देशमुख यांचे खाजगी सचिव ओंकारभाऊ काकडे, माजी सरपंच प्रदिप वानखडे,गजाननराव चव्हाण, कैलास हांडे यांच्या हस्ते प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्था कारंजाचे नवनियुक्त संचालक प्रशांत पाटील काळे यांचा शाल श्रीफळ हार घालून भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देतांना प्रशांत काळे यांनी सांगीतले की, "प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्था ही कारंजा तालुक्याच्या बँकिंग क्षेत्रातील विश्वासपात्र पतसंस्था असून आपल्या ग्राहकांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार आहे." यावेळी पुढे बोलतांना त्यांनी "हा माझा सत्कार नसून,सदानकदा आपल्या ग्राहकांच्या विकासाभुमिख राहणाऱ्या,जनता जनार्दनांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या,प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेचा गौरव आहे." असे सांगितले.