कारंजा (लाड) : सन 2014 च्या निवडणूकीनंतर, मोठा गाजावाजा करीत सुरु करण्यात आलेल्या, प्रधानमंत्री आवास योजनेला सन 2020 मध्ये आलेल्या कोव्हिड -19 कोरोना महामारी पासून ब्रेक लागलेला असून, तळागाळातील गरजू व्यक्ती, घरकुल योजनेपासून अलिप्त राहीलेले आहेत. यामध्येही महत्वाचे म्हणजे दिव्यांग, अनाथ, निराधार, विधवा महिला, फुटपाथवर राहणारे किंवा पालात राहणार्या तसेच मंदिर, मस्जिद, दरगाह किंवा धार्मिक संस्थानच्या जागेत राहणार्या कुटूंबांचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे या कुटुंबाना घरकुल योजनेचा लाभ मिळणार की नाही ? हा महत्वाचा विषय असून, प्रत्यक्ष शासनच या विषयाबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुढील एकवर्षाने प्रत्येक पक्षाला आणि आमदार महोदयांना निवडणुकाला सामोरे जायचे आहे. आणि निवडणूकीत ह्या तळागाळातील गोरगरीबांची मतं ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारंजाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार राजेन्द्र पाटणी यांनी तळागाळातील गरजू असलेल्या गोरगरीब, दिव्यांग, विधवा महिला आणि निराधारांच्या तसेच पालावर , फुटपाथवर किंवा मंदिर-मस्जिद-दरगाह इ धार्मिक स्थळांवर राहणार्या लोकांची घरकुलाची समस्या सोडवून, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी कारंजेकरांकडून होत आहे.