कारंजा : कारंजा तालुक्यातील बेलखेड (कामठा) येथील दिवंगत प्रभारी उपसरपंच रघुनाथ इंदोरे यांचे निधन झाले त्यामुळे प्रभारी सरपंच /उपसरपंच पद हे रिक्त असल्यामुळे होते त्यामुळे तहसीलदार निवडणूक अधिकारी यांच्या आदेशान्वे आज दिनांक 13.1.2023 रोजी प्रभारी सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली
स्वर्गीय प्रकाश दादा डहाके गटाचे अरुण सुधाकरराव वानखडे यांच्या गटा कडून सुरेश विठुजी बहुटे यांनी उपसरपंचाचा अर्ज भरला असता दोन्ही गटाकडून समसमान मत पडली असता ईश्वर चिट्ठी काढण्यात आली या चिट्टी मध्ये सुरेश विठूजी बहुटे हे एका मताने उपसरपंच पदावर विराजमान होऊन प्रभारी सरपंच पदाचा बहुमान त्यांनी मिळविला स्वर्गीय प्रकाश दादा डहाके यांच्या निकट व निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणारे सुरेश बहुटे गेल्या 40 वर्षापासून ग्रामपंचायत बेलखेडच्या सक्रिय राजकारणात असून यापूर्वी त्यांनी कार्यकारी सरपंच उपसरपंच सदस्य पद हे बऱ्याच वेळा भोगले सक्रिय राजकारणाचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे आज त्यांच्या गळ्यात प्रभारी सरपंच ग्रामपंचायत बेलखेड माळ अखेर गळ्यात पडली आहे
त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की माझ्यावर जो विश्वास स्वर्गीय प्रकाश दादा डहाके गटाने माझ्यावर टाकला आहे त्या विश्वासाला मी कदापिही तळा जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी गावकऱ्यांना व त्यांच्या गटातील लोकांना दिला त्याचे सर्व श्रेय अरुण सुधाकरराव वानखडे तसेच कैलास जाधवरावजी वानखडे सुनील देशमुख व हितचिंतकांना दिले आहे. असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे .