कारंजा : कारंजा येथील भटक्या विमुक्त समाजाचे नेते, दिव्यांग समाजसेवक, वास्तववादी लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यीक, आपल्या "गोंधळ जागरण" लोककलेच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेर गुजरात - उत्तर प्रदेश - मध्यप्रदेशातही आपला ठसा उमटविणारे लोककलावंत, निर्भिड पत्रकार संजय महाराज कडोळे यांना, मॉ जिजाऊ फाऊण्डेशनचा, इसन २०२२-२३ चा "राज्यस्तरिय आदर्श नेता राजरत्न पुरस्कार" जाहिर झाल्याने कारंजेकर भटक्या विमुक्त समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. संजय कडोळे यांना हा पुरस्कार झाल्याचे कळताच शिक्षक आमदार एड किरणराव सरनाईक, प्रदिप वानखडे, जि प चे माजी सभापती जयकिसन राठोड, चित्रकथी समाज संघटनेचे राजुभाऊ अवताडे, जि प चे माजी उपाध्यक्ष अरुण पाटील ताथोड , लोमेश पाटील चौधरी, आरिफभाई पोपटे, जाहिरभाई, मोहम्मद मुन्निवाले आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी सुद्धा सन १९८४-८५ पासून संजय कडोळे यांनी शेकडो पुरस्कारा सोबतच प्रामुख्याने उल्लेखनिय म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या, सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाचा "राज्यस्तरिय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा-महाराष्ट्र शासन पुरस्कार" डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, राजर्षि शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, राज्यस्तरिय पत्रकारिता पुरस्कार, संत गाडगे बाबा स्वच्छतादूत राष्ट्रीय पुरस्कार, डॉ राधाकृष्णन शिक्षकरत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळालेले असून त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आजपर्यंत शासनाने एकूण तिन वेळा त्यांची जिल्हास्तारिय वृध्द साहित्यीक कलाकार निवड समिती मध्ये सुध्दा "अशासकिय सदस्य" म्हणून निवड केली होती. शिवाय ते महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या हरितसेनेचे सदस्य, विश्व मराठी साहित्य परिषदेचे आजिवन सदस्य, महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष, ज्ञानगंगा विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.महत्वाचे म्हणजे सन १९८४-८५ पासून त्यांनी स्वतःला समाजसेवेकरीता झोकून दिलेले असून ते वेळोवेळी आपल्या समाज प्रबोधनातून राष्ट्रिय कार्यक्रमाची जनजागृती आणि आरोग्यनिदान, नेत्रचिकित्सा, रक्तदान शिबीर घेत असतात त्यांनी अनेक वेळा रक्तदान केलेले असून मरणोत्तर नेत्रदान-देहदानाचा संकल्प सुद्धा केलेला आहे.