कारंजा : येथून जवळच नेर मार्गावर असलेल्या श्रीक्षेत्र नागाबाबा संस्थान येथील आमदार राजेंद्र पाटणी यांच्या उपस्थितित होणाऱ्या, संतकवीवर्य प्रदिप देशमुख यांच्या "श्री नागाबाबा भक्तिगीत" प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे हे आपले सहकारी कैलास हांडे यांचेसह दुचाकीने जात असतांना येवता ते मनभा मार्गावर अचानक आडवे कुत्रे आडवे आल्याने, कुत्र्याच्या अंगावरूनच दुचाकी गेली व पुढे दुचाकी स्लिप होत फरफटत गेली असता वाहनचालक कैलास हांडे यांचा टोंगळा फुटून, रक्तस्त्राव झाला तर ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांच्या तळहातात रस्त्यावरील गिट्टीची चुरी घुसून हात रक्तबंबाळ झाला होता . परंतु तरीही त्यांना मात्र किरकोळ दुखापत असल्याचे त्यांनी स्वतः कळविले .
यावेळी कारंजाकडे जाणारे, मनभा येथील मुस्लिम बांधवानी मदतीचा हाथ देत त्यांना मनभा येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात नेऊन त्यांचेवर प्राथमिक उपचार केले . त्यानंतर कैलास हांडे यांचे टोंगळ्यावर कारंजा रुग्नालयात टाके मारण्यात आले . मुस्लिम बांधवानी दाखविलेल्या सौहार्दा बद्दल संजय कडोळे यांनी अश्रूपूर्ण नयनांनी त्यांचे आभार मानले . अपघाताची माहिती कळताच पत्रकार मंडळी आरिफ पोपटे, मोहम्मद मुन्निवाले विजय खंडार, किशोर धाकतोड शिक्षक यांनी चौकशी केली .यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मनभा येथे टि.टी . ( धनुवाताचे ) चे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे आढळून आले .