छत्तीसगडमध्ये भीषण अपघात झाला आहे. बोलेरो गाडीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली आहे. बालोद जिल्ह्यातील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. पुरुर चौकी परिसरात घडलेल्या या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. या घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला.