ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज शेतशिवरात कृषी पंपाची लाईन सध्यास्थितीत दिवसा एक आठवडा व रात्रो ला एक आठवडा लाडज फिडर वरून सुरू आहे. चिखलगांव, पिंपळगाव भोसले, सोंदरी येथील शेतकऱ्याची शेती ही लाडज शिवारात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आवागमन करण्याकरीता नदी ओलाडुन नावेने जावे लागत आहे. परिणामी पुला अभावी शेतकऱ्याचे हाल होत आहेत. सद्या पावसाळयाचे दिवस असल्यामुळे नदी फाट्याला पूर येत असल्याच्या कारणास्तव रात्रीच्या सुमारास पुरातून आवागमन करण्याची सोय नाही. तसेच रात्रीच्या सुमारास हिंस्त्र श्वापदांचा धोका असल्यामुळे शेतात पाणी देण्यासाठी कृषी पंप सुरू करण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. तसेच या शेत शिवारात विधवा, परितक्त्या महीलाची शेती असल्यामुळे रात्रीच्या सुमारास कृषी पंपाची लाईन सुरू करण्यासाठी एकटे कसं जायचं असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय हिंस्त्र श्वापदानी रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यावर हल्ला केल्यास त्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या सुमारास लाडज फिडरवर लाईन सुरू राहत असल्यामुळे लाडज कृषी पंपाची लाईन सुरु असते. परंतु नदीच्या पात्रातून आवागमन करण्यासाठी डोंग्याची सोय नसल्यामुळे रात्रीच्या सुमारास लाईन सुरू असूनही त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही, त्यामुळे कृषी पंपाची लाईन फक्त दिवस पाळीलाच सकाळी ८ वाजता पासून देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेचे प्रा. अमृत नखाते उपजिल्हाप्रमुख चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय ब्रह्मपुरीचे उपकार्यकारी अभियंता श्री. लिखार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख केवळ राम पारधी, माजी शहर प्रमुख शामराव भानारकर, सुरेश दूनेदार सरपंच पिंपळगाव, डाकरामजी ठेंगरी माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष चिखलगाव, चक्रधर पिलारे, रवींद्र कांमडी, तुळशीदास उरकुडे,प्रवीण कुथे, नेताजी नाकतोडे, उत्तम ठेंगरे, लाला सहारे, संतोष राऊत, रमहारी ठेंगरे, यशवंत मोहूर्ले आदी. शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.