नागपूर : "सामाजिक कार्यकर्ते हे स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून निःस्वार्थपणे,तन मन धनाने समाजाची सेवा करीत असतात. त्यामुळे त्यांचा आदर आणि सन्मान करणे समाजाचे कर्तव्य आहे.त्यांना पुरस्कारीत केल्याने, सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढून,त्यांना प्रेरणा मिळून त्यांचे बळ वाढत असते.म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याकरीता असे कार्यक्रम व्हायला हवे आहेत.वास्तविक पहाता शासनाने हे कार्य करायला हवे परंतु खऱ्या अर्थाने शासनाचे कर्तव्य,नागपूरची मदत सामाजिक संघटना गेल्या 21 वर्षापासून,दरवर्षी सातत्याने, "सामाजिक कार्यकर्ता संमेलन व पुरस्कार सोहळा" आयोजीत करून पार पाडीत आहे.याचा मला निश्चितच अभिमान आहे.त्यामुळेच मी थेट छत्तीसगड वरून,सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्यासाठी,संस्थापक दिनेश बाबू वाघमारे यांच्या सामाजिक कार्यकर्ता संमेलनाला उपस्थित झालो आहे."

असे प्रतिपादन आपल्या उद्घाटनपर संभाषणातून उदघाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले. त्यांच्या या संभाषणाने उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढून भरभरून प्रोत्साहन मिळाल्याचे दिसून येत होते. याबाबत अधिक वृत्त असे की, रविवार दि.05 नोहेंबर 2023 रोजी नागपूरच्या श्री गुरुदेव सेवाश्रम सभागृहामध्ये नागपूरच्या मदत सामाजिक संस्थेचे एकविसावे "सामाजिक कार्यकर्ता संमेलन" उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,कार्यक्रमाध्यक्ष राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गिरीष पांडव, प्रमुख अतिथी,अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणिस अनिल नगराळे,अँड नंदाताई पराते, माजी नगरसेवक मनोज गावंडे, मनोज साबळे, सुभाष भोयर,श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूरचे अध्यक्ष अँड अशोक यावले, कविवर्य सुदाम खरे,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे, कृष्णा गोटफोडे,मदतचे कार्यकारी अध्यक्ष नरेश खडसे, संस्थापक तथा सचिव दिनेशबाबू वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते,राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराज यांच्या चौकातील पुतळ्याला आणि महामानवाच्या प्रतिमेला हारार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संपादक संजय कडोळे यांच्या लोकप्रिय साप्ताहिक "करंजमहात्म्य" विशेषंकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रास्ताविकामधून दिनेशबाबू वाघमारे यांनी संस्थेच्या मानवसेवी कार्याची इत्यंभूत माहिती दिली.त्यानंतर मान्यवरांनी आपले विचार मांडले. विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी आपल्या संभाषणातून, "लोकसहभागामधून मदत सामाजिक संस्था करीत असलेले सामाजिक कार्यकर्ता संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे कार्य" प्रशंसनिय असल्याचे सांगीतले. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मधून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना विविध राज्यस्तरिय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील गोंधळी समाजाचे लोककलावंत गोपाल नारायण मुदगल, वाशिम जिल्ह्यातून वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार, रुईगोस्ता (मानोरा) येथील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे,श्रीराम व्यायाम मंडळ कारंजाचे अध्यक्ष अमोल शालिग्राम अघम, साहित्यीका अँड सौ. मंगलाताई नागरे,स्त्री शक्ती मंचाच्या अध्यक्षा सौ.शारदाताई अतुल भुयार, निःस्वार्थ रुग्नसेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. कृपाताई ठाकरे इत्यांदीना राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाकरीता मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नरेश खडसे,सचिव दिनेशबाबू वाघमारे, अरुण फुलझेले,त्रिशरण पाटील, धर्मेंद्र धनविजय,रेखाताई थुल आदींनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....