कारंजा:- दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी अडाण नदीवरील सत्तरसावंगी बॅरेजला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील धामणी, खडी, पिंपळशेंडा, एकांबा आमगव्हाण व सत्तर सावंगी शिवारातील 1300 हेक्टरपेक्षाही अधिक शेती सिंचनाखाली येणार आहे. आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी सत्तरसावंगी सहित बोरव्हा, घोटा , शिवणी येथील बॅरेजला नव्याने प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्र देवून पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेवून शासनाने बोरव्हा, घोटा, शिवणी बॅरेजला यापूर्वीच मंजुरात दिली होती. तेव्हाच सत्तरसावंगी बॅरेज लवकरच मंजुर होईल असे आ. पाटणी यांनी सांगीतले होते. अखेर कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी शासनाकडून सत्तरसावंगीला मंजुरात मिळविली. विभागातील शेतकऱ्यांची बहु प्रतीक्षित मागणी आज मान्य झाली. अनेकांनी आभार मानले.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.