कारंजा:-
स्थानिक सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या,आदर्श जय भारत सेवाभावी संस्था कोळी कारंजाच्या वतीने,मंगळवार दि. ०७ मार्च रोजी,श्रीक्षेत्र चवर्या महादेव संस्थान शेलूवाडा येथे, होळी-शिमगा,धुळवड,रंगपंचमी निमित्त समाजामध्ये सकारात्मक संदेश देण्याच्या उद्देशाने डॉ ज्ञानेश्वर गरड यांच्या पुढाकारातून,आपला मानवी आहार ! शाकाहार !! दुव्यर्सनांचा करू धिक्कार !! हा सुविचार देत,धुळवडीला एकमेकांवर चिखलफेक न करता,पर्यावरणाविषयी व आपल्या आरोग्याविषयी जनजागृती करीत,सुदृढ आरोग्याकरीता विनोद,भजन, गीत-संगीत,काव्य इत्यादीच्या पालापाचोळ्याचे रंग संगीत महोत्सव सुविचार संमेलन घेण्यात आले होते.सदरहू कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद प्राथ शाळा कामरगावचे शिक्षक तथा इच्चूकाटा या विनोदी काव्यमैफिल कार्यक्रमाचे निर्माते गोपाल खाडे (गुरुजी) हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून दारुबंदी व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे प्रचारक दिलीपजी गिल्डा,माजी प्रथम श्रेणी अधिकारी राजेंद्र दिगडे,डॉ कलिम मिर्झा,डॉ.आशिष सावजी, संतोषराव वानखडे होते.तर विशेष अतिथी अभा नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर,नगर पालिका कारंजाचे माजी उपाध्यक्ष रामबकस डेंडूळे,ज्येष्ठ समाजसेविका पार्वताबाई शिंदे, शांताबाई गरड ह्या होत्या. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते,आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेच्या वतीने चवऱ्या महादेवाचे पूजन व हारार्पण करण्यात येवून मान्यवरांना पुष्पगुच्छ-सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी "शुद्ध आहार-शाकाहार आणि दुर्व्यसन-दुर्विचाराचा धिक्कार"हा संदेश देत मानवी शरीराकरीता शाकाहार आणि निर्व्यसनी राहणे किती महत्वाचे आहे हे पटवून सांगीतले.तर दिलीपजी गिल्डा यांनी आपल्या कवितांमधून व्यसनमुक्तीवर प्रबोधन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष इच्चूकाटा या विनोदी कार्यक्रमाचे निर्माते गोपाल खाडे (गुरुजी) यांनी वराडी भाषेतून विनोदी कवितांद्वारे उपस्थितांचे मनोरंजनातून प्रबोधन करून कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली.डॉ.ज्ञानेश्वर गरड,ईरो फिल्मसचे निर्माते रोमिल लाठीया,नंदकिशोर कव्हळकर, माजी सरपंच प्रदिप वानखडे,गोपाल काकड, डॉ.आशिष सावजी,डॉ कलिम मिर्झा,रामबकस डेंडूळे,उमेश अनासाने,डॉ इम्तियाज लुलानिया,गोपिनाथ डेंडूळे, किरण गुप्ता,अनिल मसालेवाले पत्रकार हफिजखान,सुनिल गुंठेवार इत्यादी मंडळीनी आपले गीतगायन प्रस्तुत केले.शेवटी सर्वांनी एकमेकांना हळद कुंकवापासून तयार केलेले रंग लावून "किती सांगू नी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला." या गवळणीचे नृत्यावर ताल धरीत, रंग लावून होळी साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाकरीता शेलूवाडा येथील पार्वताबाई शिंदे, जिजाबाई मस्के,उपसरपंच गुलाब चव्हाण, हभप रामदास महाराज मस्के, राजेंद्र कांबळे,गोपाल काकड, पंजाबराव मस्के,चंदू वानखडे, महादेव जिरे,संतोष सोनेकर, रामकृष्ण नेतनकर,संतोष वर्मा, गजानन मस्के,शेषराव चव्हाण आदींचे सहकार्य लाभले. होळीच्या पर्वावर समाजामध्ये सकारात्मक संदेश देण्याच्या उदात्त हेतून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामिण पोलिस स्टेशन कारंजाचे पो.कॉ.धनराज पवार यांनी व त्यांच्या सहकार्यानी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्येने रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन प्रायोजक : साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार कारंजाचे संपादक संजय कडोळे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार आयोजक डॉ ज्ञानेश्वर गरड यांनी व्यक्त केले. असे वृत्त उमेश अनासाने यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....