एनडीए सरकारच्या काळात अनेक योजना राबविल्या गेल्या त्यातील एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना.या योजनेची प्रत्यक्ष अंमबजावणी करताना अनेक अडचणी आल्या त्यावर योग्य उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न शासनाचे वतीने जरूर करण्यात येईल असे आश्वासन भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय महामंत्री व महाराष्ट्र राज्य चे ओबीसी मोर्चा प्रभारी उत्तरप्रदेश चे खासदार संगामलाल जी गुप्ता यांनी पूर्व विदर्भ ओबीसी मोर्चा पदाधिकारी व ओबीसी मधील लहान समाज यांचे प्रतिनिधी यांचे नागपूर हुडकेश्वर येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील येथील बैठकीत दिले .या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष संजय जी गाते,प्रदेश उपाध्यक्ष श्री डी डी सोनटक्के, डॉ अशोक जीवतोडे,प्रदेश संपर्क प्रमुख रविजी चव्हाण,प्रदेश महामंत्री तथा नागपूरच्या माजी महापौर अर्चनाताई डेहनकर,प्रदेश सचिव प्रा प्रकाश बगमारे,रवी उपासे,विदर्भ संपर्क प्रमुख डॉ रवीजी येनुरकर यांचे सह विविध 17मायक्रो ओबीसी मधील जात समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्वांनी आपल्या समाजाच्या पारंपरिक व्यवसायात येणाऱ्या अडचणीचा उलगडा केला व त्यावर उपाययोजना करण्यात यावी याचे विवेचन केले.यामध्ये सुतार,लोहार, नाव्ही ,धोबी,सोनार,शिंपी, बारई ,वडार,कुंभार व अन्य लहान जातीचे प्रश्न तातडीने सोडविण्यासठी प्रयत्न शासन स्तरावर करावे असे आवाहन केले तसेच प्रमुख ओबीसी जाती मधील कुणबी ,तेली, माळी यांचे प्रतिनिधी यांनी ओबीसी चे आरक्षण मराठ्यांचे दबावाखाली कमी करू नये अशी भावना व्यक्त केली .ब्रम्हपुरी येथील ओबीसी प्रतिनिधी प्रा प्रकाश बगमारे यांनी ओबीसी आरक्षण मुद्दा स्पष्ट करून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना यातील त्रुटी दूर करण्याचा आग्रह केला.ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज भूपाल यांनी बारई समाजाचे प्रश्न तातडीने सोडविले जावे हि आग्रही मागणी केली,ओबीसी मोर्चा शहर महामंत्री प्रा दिलीप जुमडे यांनी शिंपी समाज आज रेडीमेड मुळे कसा बेरोजगार झाला हे उपस्थित मान्यवर यांना समजाऊन सांगितले तर नाव्ही समाजाचे प्रतिनिधी घनश्याम सूर्यवंशी यांनी समाजाच्या कथा, व्यथा नमूद करून घरकुल निधी वेळेत मिळत नसल्याचे मान्यवरांचे लक्षात आणून दिले व नाजूक रासेकर यांनी सुतार लोहार समाजाचे प्रश्न तातडीने सोडविले जावे यासाठी उपस्थित मान्यवर यांनी केंद्र राज्य स्तरावर प्रयत्न करावा अशी विनंती केली
मान्यवर यांनी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस,प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश प्रभारी मंत्री भूपेंद्रजी यादव,सहप्रभारी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सह चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले