कारंजा : स्नेहालय अहमदनगर येथून आनंदवन वरोरा पर्यंत डॉ विकास आमटे अमृत महोत्सव सामिती द्वारे, सद्भावना सायकल यात्रा सुमारे 750 किलोंमिटर अंतर पार करणारआहे . सदर्हू सद्भावना यात्रेचे कारंजा येथे 450 किलोमिटरचा टप्पा पुर्ण करून दि 5/11/22 रोजी सकाळी 11 वाजता आगमन झाले . यावेळी ग्राम वाई परिसरामध्ये सदर यात्रेचे सर्वप्रथम सर्वधर्मसमभाव आपात्कालिन संस्थेचे [सास] प्रमुख श्याम सवाई यांनी स्वागत केले . यावेळी मार्गाने प्रवास करणारे राष्ट्रीय सायकलपटू डॉ हर्षल अशोकराव झोपाटे यवतमाळ,स्वप्नील मयुरे,सौ संध्या मयुरे बुलढाणा यांनी केले कारंजा येथील महालक्ष्मी मंगलम येथे प्रथम सदभावना यात्रेमधील मान्यवरांचे हस्ते कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून यात्रेमध्ये सहभागी मान्यवराचे स्वागत कारंजा येथील युवा समाजसेवक महेश चौधरी यांनी केले . यावेळी सर्वधर्म मित्र मंडळचे अध्यक्ष श्याम रामदास सवाई,अन्नपुर्णा बहुउद्देशिय संस्था अध्यक्ष महेश चौधरी,संत गाडगेबाबा विचार मंच बहू उदेशिय संस्था अध्यक्ष संतोष घोंगडे ,विमल फाऊडेशनचे अध्यक्ष निलेश काळे , निलेश हेडा सास सहयोगी सामितीचे रमाकांत भुतळा, कर्तव्यसेवक रावि घाटे ,कपिल धोटे ऋषीकेश परळीकर ,वैभव शिंदे यांची उपस्थिती होती.

सदर यात्रेमध्ये सहभागी व्यक्तिंनी, कर्मयोगी डॉ विकास आमटे यांच्या सामाजिक कार्याचा प्रेरणादय माहिती दिली . यात संयोजक सस्था स्नेहप्रेम कर्जत ,उचल फंऊडेशन शेवगाव,स्नेहालय अहमदनगर ,अनामप्रेम अमदनगर ,महामानव बाबा आमटे बहू संस्था ,घुगलवडगांव या संस्था एकत्र येवून "नफरत छोडो दिल को जोडो भारत जोडो भारत जोडो " अभियानांतर्गत सदर स्नेहालय ते आनंदवन या दरम्यान 750 किलो मिटर च्या सदभावना सायकल यात्रे मध्ये सुरूवातीपासून कर्मयोगी डॉ. विकास आमटे अमृत महोत्सवी अभिवादन सद्भावना सायकल यात्रेतील सहभागी सायकल यात्री, महारुद्र खेडकर ,विवेक खेडकर ,ओंकार गाडे ,रोहित क्षेत्रे,संदीप उबाळे ,अनिकेत तोरडमल, हाजी मुजावर,करण असावरे,कासिम मुजावर ,मनोज मुंगळे ,योगेश नरवणे,अक्षय सूर्यवंशी ,दत्तू शिर्के काका,सचिन खेडकर ,फारुक बेग,स्वाती ढवळे इत्यादी सक्रीय सहभागी आहेत . कारंजा शहरात सास चे श्याम सवाई,अन्नपूर्णा ग्रुपचे युवा समाजसेवक महेश चौधरी ,संत गाडगेबाबा बहु संस्थेचे अध्यक्ष संतोष घोगंडे,विमल फाऊंडेशनचे निलेश काळे ,सास सहयोगी रमाकांत भुतडा ,वन सेंकद वन कॉल न्यु लाईफ अभियान सास कंट्रोल रूमच्या जयगजानन रूग्णवाहीकेचे चालक कपील धोटे, रवि घाटे , भारत हाडंगे, सुरेश तिडके , सचिन कोळसकर, अमोल राऊत , पवन क्रुहे , अश्विन जगताप, आशाबाई ठाकुर , सारंग चौधरी, संतोष चौधरी , काबुल शेख, ऋषीकेश परळीकर,वैभव शिंदे ,संदीप कुन्हे, केसवाणी यांनी सहभाग दिला ,सदर सायकल यात्रेच्या सुरक्षाकरीता ग्रामिण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनामध्ये . पो.कॉ मिथुन सोनोने, पोलीस कर्मचारी व सास कंट्रोलरूम यांचे सहकार्य मिळाले .सायकल यात्रेच्या कार्यक्रमाचे संचालन कपील धोटे,प्रास्तविक महेश चौधरी तर आभार रवि घाटे यांनी मानले . स्वागत समारंभानंतर सदभावना सायकल यात्रा पुढील शहराकडे मार्गस्थ झाली असे वृत्त पत्रकार श्याम सवाई यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....