मूल तालुक्यांतर्गत येणाऱ्या नांदगाव येथील रहिवासी व्यक्ती पत्नी व मुलासह घोसरी लालहेटी परिसरात शेळ्या चरण्यासाठी गेले होते. रात्र झाल्यामुळे ते शेळ्यांसह शेतातच झोपले. त्याचवेळी झोपेत असलेल्या कीवार यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यांच्या शेजारी पती सुरेश दुरकीवार व मुलगा पंकज दुरकीवार झोपले होते. महिलेच्या ओरडण्याने ते दोघेही जागे झाले. तिघांनीही वाघाशी झुंज दिली. संघर्षानंतर वाघ तेथून पळून गेला. मात्र यामध्ये पती, पत्नी व मुलगा हे तिघेही जखमी झाले.