कारंजा (लाड) : कारंजा येथे नगर पालिका कार्यालया शेजारी,ऐतिहासिक व प्राचिन श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजा असून,आश्विन शारदीय नवरात्रोत्सवात येथे भव्य यात्रा आणि मातृशक्ती उपासकांची मांदियाळी बघायला मिळते.भक्ताच्या मनोकामना पूर्ण होऊन इच्छा पूर्तीचे समाधान देणारी जागृत देवी म्हणून आद्यशक्ती श्री कामाक्षा देवीची महिमा आहे.पुढील महिन्यात देवीचे नवरात्र प्रारंभ होणार असून,सध्या मंदिराचे पश्चिम बाजूकडील डाव्या बाजूच्या भिंतीमध्ये बाहेरून झाडे वाढल्याने,भिंतीच्या बाह्यभागाला तडे गेल्याने त्याची दुरुस्ती व मंदिर सभागृहाला प्लॉस्टिक पेन्टची आणि कळसाची वॉटर प्रुफ सिमेंट पेंटची रंगरंगोटी करणे,तसेच भाविक भक्त मंडळी करीता पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी ॲक्वा वॉटर कुलरची व्यवस्था व मंदिराची इतरही कामे तातडीने करणे अत्यावश्यक आहेत. त्यामुळे भाविक दानशूर भक्त मंडळींनी स्वेच्छेने रंगरंगोटी व इतर कामे करून देण्यासाठी संस्थानला तनमनधनाने आणि महत्वाचे म्हणजे स्वेच्छेने सहकार्य करण्याचे आवाहन श्री कामाक्षा देवी संस्थान तर्फे पुरोहित रोहीत दिंगबरंपंत महाजन महाराज यांनी केले आहे.