ब्रम्हपूरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस दूरक्षेत्र मेंडकी हद्दीत मेंडकी ते बाळापूर रोडवर अवैधरीत्या गोवंश जनावरे वाहतूक होणार असल्याने खात्रीशीर माहीतीवरून ब्रम्हपूरी पोलीसांनी नाकाबंदी करून सदर जनावरे असलेले 4 वाहन ताब्यात सर्व गोवंशांना गोरक्षण केंद्रात जमा केले. आरोपीना पोरटेला आणून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे.

दि. 23/09/2022 चे पहाटे 03.00 ते 06:00 दरम्यान ब्रम्हपूरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस दूरक्षेत्र मेंडकी हद्दीत मेंडकी ते बाळापूर रोडवर 4 वाहनात अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याचे खात्रीलायक माहीतीवरून सदर रोडवर पोलींसाकडून नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान 4 आयसर ट्रक नं. MH 40 CD 4920, MH 40 CD 1946, MH 34 BG 4746. MH 34 AV 1205 लागोपाठ आल्यावर त्यांना थांबवून झडती घेतली असता सर्व वाहनांत गाय, बैल, गोरे असे मिळून एकुण 152 गोवंश जनावरे किं. 07,60,000रू. मिळून आलीत. जनावरांसह ट्रक कि. 40,00,000रू. असे एकूण 47,60,000रू चा माल जप्त करण्यात आला. अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या एकूण 11 आरोपीविरूध्द कलम 5 (अ) (ब) अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, सहकलम 11 (ड) (फ) महाराष्ट्र प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, सहकलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सहकलम 83 / 177 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आलेला आहे. सर्व जनावरांना गोमाता सेवाभावी संस्था, गोरक्षण शिरसाळा ता. पवनी येथे दाखल करण्यात आलेले आहे.

सदरची कार्यवाही श्री. मल्लिकार्जून इंगळे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल, अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपूरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव, पोउपनी मोरेश्वर लाकडे, पोउपनी सुरेंद्र उपरे पोहवा / अरून पीसे, हरीदास सुरपाम, धृवबाळ पिल्लारे, नापो / योगेश शिवनकर, पवन डाखरे, नाजूकराव चहांदे, श्रीराम पांडे, पोशी / अजय कटाईत. चंद्रशेखर कांबळे, प्रमोद सावसाकडे, महीला पोलीस पुजा राउत यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी सुरेंद्र उपरे पोस्टे ब्रम्हपूरी हे करीत आहेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....