वाशिम : प्रथमच मोबाईल वर्कशॉपच्या माध्यमातुन शिबीरस्थळी आधुनिक व उच्च
तंत्रज्ञान युक्त केलिपर्स/कृत्रिम हात-पायाचे दिव्यांगांना निशुल्क वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वितक्षण तज्ज्ञांच्या
तपासणीच्या आधारावर केले जाणार आहे. वाशिम येथे ८ जुलै रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदा नगर, वाशिम,
मंगरूळपीर येथे ९ जुलै रोजी
जुनी पंचायत समिती सभागृह, मंगरूळपीर, मानोरा येथे
१० जुलै रोजी पंचायत समिती मानोरा,
कारंजा येथे ११ जुलै रोजी
पंचायत समिती कारंजा, रिसोड येथे १२ जुलै रोजी पंचायत समिती रिसोड
व मालेगाव येथे १३ जुलै रोजी पंचायत समिती मालेगाव येथे करण्यात येणार आहे. तरी अस्थिव्यंग प्रवर्गातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी नि:शुल्क शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....