कारंजा : वाशिम जिल्ह्याचे लोकप्रिय व विकासाभिमुख पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह वाशिम येथे जिल्हा नियोजन समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ च्या पुनर्विनियोजनास कार्योत्तर मंजूरी प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ माहे ३१मार्च २०२२ अखेर पर्यंतच्या खर्चास मंजूरी प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ मध्ये लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी एक कोटी रुपयांच्या पुनर्विनियोजनास कार्योत्तर मंजूरी प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ माहे सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा या सभेत घेण्यात येईल. तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर आलेल्या विषयावर चर्चा करण्यात येईल. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम कडे प्राप्त झाल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.