वाशिम : जिल्हा रुग्णालय, वशिम येथील नेत्रबुब्बुळे संकलन केद्राने मागील पंधरा वर्षात
एकुण ८९८ नेत्रबुब्बुळे संकलीत करुन ८९८ अंध व्यक्तीनां दृष्टी प्राप्त करुन दिली आहे. आपल्या देशात नेत्रदानाचे प्रमाण कमी असून मोठया प्रमाणावर अंध रुग्ण नेत्रबुब्बुळांच्या अभावी अंधकारमय जिवन जगत आहेत. मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण वाढल्यास या रुग्णांना नेत्रबुब्बुळ रोपन शस्त्रक्रिया करुन दृष्टी प्राप्त करुन देणे शक्य आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहायाने एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्रदानामूळे दोन व्यक्तींना दृष्टि देणे शक्य झाले आहे. कोरोना काळात नेत्रदान चळवळीस मोठा फटका बसला असून आता कुठे नेत्रदान चळवळ पूर्वपदावर येत आहे. त्यामूळे जास्तीत जास्त मरणोत्तर नेत्रदान घडवून आणावे हि आपली सामाजिक जवाबदारी आहे. नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज समाजात असुन ते दुर करण्याकरीता वाशिम येथील नेत्रबुबुळे संकलन केंद्र सदैव प्रयत्नशिल असते. या करीता जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी नेत्रदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी जिल्हयातील सर्व नागरीकांनी नेत्रदानाविषयी जनजागृती करावी तसेच नेत्रदान घडवून आणावे. कोणत्याही धर्मात नेत्रदानाला विरोध केला जात नाही. नेत्रदानाला वयोमर्यादा नाही. मधुमेह / उच्च रक्तदाब असणा-या व्यक्तीही नेत्रदान करु शकतात. मृत व्यक्तीचे जवळचे नातेवाईक सुध्दा त्या व्यक्तींचे नेत्रदान करण्यास परवाणगी देउ शकतात.मृत व्यक्तीचे डोळे काढल्यावर चेहरा विद्रुप होत नाही. मृत्यनंतर डोळे ६ ते ८ तासांच्या आत काढावे लागतात. नेत्रदानासाठी रमेश गजानन ठाकरे (नेत्रदान समूपदेशक) ९९२२५१९९४८व ८८०६८८०६४४ यांच्याशी संपर्क साधता येईल.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.