कारंजा : सन्माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या आदेशानुसार तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवजांळ, पक्षाचे नेते गजानन लोखंडकार, वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय पाकधने यांच्या सुचनेवरून वाशिम जिल्हा अध्यक्ष हेमेंद्रभाऊ ठाकरे यांच्या वतीने अनुप ठाकरे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कारंजा / मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार प्रहार जनशक्ती पक्षाची ध्येयधोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेमार्फत निष्ठेने राबवावी व यामध्ये आपणाकडून कोणतीही दिरंगाई अथवा तडजोड स्विकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी तसेच आपण व आपल्या सहकाऱ्यांकडून समाजात कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश जाणार नाही, अशाप्रकारची पक्षनिष्ठ कृती आपणाकडून अपेक्षित असुन दिव्यांग बांधवांना,जनतेला, भगीनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडून यावे करिता आपणांस आपल्या पदाच्या कारकिर्दीसाठी व भावी वाटचालीस मनस्वी शुभेच्छा देऊन नियुक्तीपत्र सन्माननीय जिल्हाध्यक्ष हेमेंद्रभाऊ ठाकरे यांनी दिले.प्रहार जनशक्ती पक्ष सर्वच राजकिय पक्षा पेक्षा आगळे वेगळे काम करत असुन प्रहार पक्षाचे १०% राजकारण व ९०% समाजकारण धोरण आहे व हिच प्रहार जनशक्ती पक्षाची ओळख जनमानसात निर्माण झाली आहे.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय पाकधने, ज्ञानेश्वर खाडे, मनिष राठोड, राहुल ठाकरे, गजानन करडे, विठ्ठल (इंद्रा) आंबेकर, आकाश मुसळे, संजय महाजन, प्रदीप राऊत, अमोल घाने, पुंडलिक लसनकुटे, गजानन नगराळे, दिपक पाटील, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारंजा/ मानोरा विधानसभा अध्यक्ष अनुप ठाकरे यांनी निवडीबद्दल प्रहार जिल्हाध्यक्ष हेमेंद्रभाऊ ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाची विचारधारा पोहचवण्यास अग्रेसर राहील, प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातुन सर्वांशी समन्वय साधून पक्षाच्या ध्येय- धोरणानुसार कार्य करण्यासाठी जनतेला प्रेरित करील, पक्षाला मजबुत करण्याचे कार्य व पक्षाचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवुन प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटन मजबुत करणार असे निवडीबद्दल बोलताना कारंजा/ मानोरा विधानसभा अध्यक्ष अनुप ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वचस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.