कारंजा तालुका प्रतिनिधि- शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने ग्राम यावार्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात ५ जून ते ११ जून या कालावधीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दिनांक 10 जून रोजी विवेक जनार्धन पोहेकर यानी पाणी व नैसर्गिक संसाधने यांचे जतन, स्वच्छता इत्यादींच्या अनुषंगाने पर्यावरण जाणीव जागृती करीता जलसवर्धनाचे महत्व सांगून पाणी तपासणी बाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा नुसार भविष्यात चांगले व यशस्वी आणि नवोपक्रमशील नागरिक बनवण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ठ कौशल्ये आणि क्षमता विकसित गरजेचे आहे. या कौशल्यामध्ये पाणी व नैसर्गिक संसाधने यांचे जतन, स्वच्छता इत्यादींच्या अनुषंगाने पर्यावरण जाणीव जागृती विकसीत करणे हि - महत्त्वाची क्षमता आहे. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राम पंचायत यावर्डी येथील शिपाई विवेक जनार्धन पोहेकर तर प्रमुख अतिथि म्हणून संस्थेचे संचालक देविदास काळबांडे उपस्थित होते. यावेळी वर्ग 8,9,10 विच्या उपस्थित विद्यार्थ्यांनी पानी तपासणी बाबत अनेक प्रश्न विचारले. विवेक पोहेकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीत.