कारंजा ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) :- आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने शासन निर्णय करून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या विकास कामांना शासन आदेशान्वये मंजुरी दिली आहे. कारंजा-मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविने करिता २५१५ १२३८ लेखाशीर्ष अंतर्गत या विकास कामांना या योजने अंतर्गत सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून मंजुरी दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील विकास कामांसाठी एकूण रु. ५००.०० लक्ष अक्षरी पाचशे लक्ष फक्त इतक्या रकमेच्या कामास प्रशासकीय मान्यता दि. १४ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णय क्रमांक विकास-२०२३/प्र.क्र.४७३(१५)/योजना-६ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांनी दिली आहे.
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने २५१५ १२३८ अंतर्गत मंजुरी मिळाली असून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कारंजा तालुक्यातील गावे खालील प्रमाणे आहेत.
जनुना येथे संत गजानन महाराज मंदिर सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, पिलखेड येथे संत तारा आई संस्थान येथे सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, वहीतखेड येथे हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, तपोवन येथे हनुमान मंदिर परिसरातील साभागृहाची दुरुस्ती करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, वाकी येथे तांडा वस्तीत सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, नारेगाव येथे गंभीरशेष महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, विरगव्हान येथे जटेश्वर मंदिर संस्थान परिसर सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १५ लक्ष रुपये , निंभा जहांगिर येथे विठ्ठल मंदिर सभागृह परिसर सौंदर्यीकरण करणे (किचन, कंपाउंड बांधकाम करणे) अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, निंभा जहांगिर येथे सदगुरुनाथ मंदिर सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, तारखेडा येथे हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, मुंगुटपुर येथे बजरंग बली मंदिर पासून ते मधुकर उत्तम मांजरे यांच्या घारापर्यंत सिमेंट रस्ता करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, भामदेवी येथे अहिल्याबाई होळकर चौक परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १५ लक्ष रुपये, धोत्रा देशमुख येथे अंजनी माता मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १५ लक्ष रुपये, वाल्हई येथे सामाजिक सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, कामठवाडा येथे चंदनशेष महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, दिघी येथे हनुमान-मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १५ लक्ष रुपये, पानविहीर येथे खंडोबा मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, मोखड येथे राममंदिर परिसर जवळ सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, गंगापूर बजरंगबली मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, गणेशपूर येथे स्मशानभूमी शेड बांधकाम सौंदर्यीकरण करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, अनई येथे गोरक्षनाथ महाराज संस्थान सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, धानोरा येथे गावाच्याआतील समाज मंदिरासमोर डोमशेड सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १५ लक्ष रुपये, इंझा येथे हनुमान मंदिर परिसरात सौंदर्यीकरण करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, कुपटी येथे शिवाजी महाराज चौकात सौंदर्यीकरण अंदाजीत किंमत ७ लक्ष रुपये, शहादतपुर येथे हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, वापटी येथे हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लोक बसविणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, बांबर्डा येथे वस्तीत हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, जलालपूर येथे स्मशानभूमी बांधकाम करणे अंदाजीत किंमत ७ लक्ष रुपये, शेमलाई येथे गुलालशेष महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, अंबोडा येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, हिंगणवाडी येथे गजानन महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, रामटेक येथे चंदनशेष महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, लाडेगाव येथे स्मशानभूमी सौंदर्यीकरण करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, रहाटी येथे स्मशानभूमी सौंदर्यीकरण करणे अंदाजीत किंमत ७ लक्ष रुपये. खेर्डा बु. येथे राणू माता मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, किनखेड येथे हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, बेंबळा येथे राम मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत २० लक्ष रुपये, किन्ही रोकडे येथे लष्करी महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १५ लक्ष रुपये, गिर्डा येथे संत गजानन महराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, तांदळी येथे महादेव संस्थान मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, महागाव येथे मेसकामाय मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १५ लक्ष रुपये, नागलवाडी येथे बहिरम मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, चांदई येथे नरसरी महाराज परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, भिवरी येथे गाव परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, गायवळ येथे गजानन महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत १० लक्ष रुपये, दादगाव येथे बजरंग बली मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत ९ लक्ष रुपये, शिवनगर येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला सभामंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत ५ लक्ष रुपये.
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील ४७ गावातील विकास कामांकरिता ५ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मंजूर झाले आहेत. असे संजय भेंडे तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....