समाजातील साध्या भोळ्या,लोकांच्या भावनांचे गैरफायदे घेऊन, त्यांना,अंधश्रध्दा,भिती,प्रतिष्ठेला धक्का लावण्याचे व्हायरस सोडून लूटणारे ब्रम्हदैत्त्य जागोजागी निर्माण झाले आहेत.या लूटारूंच्या अनाचारी टोळ्यांनी आनंदाला ग्रहण लाऊन समाजाला ईतर समस्यांसोबत आर्थिक संकटात आणून सोडलेले आहे.जंगलातील हिंचाचारी पशू हे परजीवी असतात.म्हणून ते शिकारींच्या शोधात असतात.परंतू आता माणसांना लूटणारी माणसंच सामाजिक, राजकीय,शासकीय,प्रशासकिय क्षेत्रात निर्माण झाल्याचे समोर येत आहे.त्यामुळे सायबर भामट्यांप्रमाणेच या वेळोवेळीच्या जबर व्हायरसनेही समाजाला आता चहूबाजूंनी घेरलेलं आहे. म्हणून "धावलं तर पळते आणि पकडलं तर चावते" अशा परिस्थितीचा सामना आज देशातील जनतेला करावा लागत आहे.चौफेर विश्वासघाताचेच अनुभव घेतल्यानंतर लोकांच्याच जीवाशी खेळणं म्हणून खेळणाऱ्या या काही पेंढाऱ्यांवर विश्वास ठेवावा तरी कसा हा आज मोठा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे.
देशातील लोकांना भितीच्या दडपणाखाली ठेऊन त्यांची लूटमार करत त्यांना नागवं करणारे, भयग्रस्त करून संपवणारे, किंवा जबरदस्तीने लसी घ्यायला लावणारे ते कोरोना आणि त्यांचे सेवक होते. नंतर औषधांच्या दुष्परिनामांनीच अनेकांची आयुष्ये संपवित त्यांना यमसदनी धाडणारा कोरोना तर माघारी गेला.नव्हे तो किती फसवा होता,आणि आपल्याच लोकांच्या टाळूवरील लोणी खाणारा तो किती खोटारडा होता हे पटत गेल्यामुळे त्याचे येथील अस्तित्व ओसरले.अंधश्रध्देच्या नादी लावणाऱ्या तुंबड्याभरू बुवा बाबांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही असे जादुचे खेळ करणारे क्रूर डोंबारी अस्तित्वात आहेत.त्यामुळे त्यांना सेवाकार्य,देवकार्य करणारे वगैरे मानण्याची काहीच गरज नाही.तर असे अनेकजण निव्वळ सेवाधर्म नव्हे तर पापाची माया कमावण्यासाठीच सिध्द असतात.ह्या लबाड्या कालांतराने पुढे आल्यात.त्यामुळे येथील अवतार कार्य फसल्यानेच या कोरोनाला पोबारा करावा लागला.परंतू त्याने जे अनेकांना मिळवून दिले किंवा अमानुषतेचे जे अनुभव दिले ते मात्र चिरंतन स्मरणदायी आणि आपल्याच लोकांपासून सावध राहण्यासाठी मात्र प्रेरणादायी ठरले.
आता असाच एक व्हायरस देशामध्ये प्रगटला आहे,आणि तो सुध्दा चिनमधून आला हे विशेष आहे.परंतू त्या तेव्हाच्या कोरोनाला जे कोणी घाबरले नाहीत,किंवा बेडरपणे ज्यांनी लसी पण घेतल्या नाहीत त्यांच्या आसपासही तो फिरकला नव्हता.तसेच या व्हायरसचे पण काय गुणधर्म आहेत ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एच एम पी व्ही नावाचा हा पाहूणा व्हायरस आहे.परंतू त्याची लागण झालेल्यांच्या प्रकृती मात्र ठणठणीत आहेत.तो गंभीर नाही,त्यामुळे हा विषाणू अजिबात घातक नाही अशा सुचना आय सी एम आर चे संशोधक,माजी महामारी विशेषज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिल्या आहेत.दवाखाण्यात सर्दी,खोकला,किंवा तापावर औषधे घेण्यासाठी गेल्यावर होणाऱ्या तपासणीत एच एम पी व्ही ची लगण झाल्याचे लक्षात येते.कोरोनाच्या बाबतितही अशाच सुचना त्यावेळी होत्या.परंतू भिती आणि घाबरून देण्याचे प्रयत्न करणाऱ्या खिसेकापू अनाचारी प्रवृत्तींपुढे अनेकांनी शरणांगती पत्करली.ते सांगतील ते ब्रम्हवाक्य मानत औषधांचे बेफाम प्रयोग स्वत:च्या शरीरावर करून घेतले.तरीही अशाच दुष्परिनामांनी गेलेले शेजारी रूग्ण पाहिल्यावर, या लूटारूंना दक्षिणा दिल्यावरही आपण आता वाचणार नाही या भितीच्या दडपणांनी आणि भयग्रस्त नकारात्मक विचारांनी अनेक रूग्णांनी प्राण सोडले.त्यावेळी दवाखाण्यांमध्ये भरती होण्याची घाई आणि सांगीतली ती औषधे काळ्या बाजारातून विकत घेण्याची शर्यत,अशा आयत्या संधी अनेक पाप्यांच्या तुंबड्या भरून गेल्या.
मनुष्यावर कोणतेही संकट आल्यावर त्याने आत्मबळ जागवून पहिला सल्ला आपल्या अंतरात्म्याचा घेतला पाहिजे.परंतू परावलंबी वृत्ती प्रचंड वाढत आहे.त्या प्रभावामुळे स्वत:ला काहीच समजत नाही असा विचार करून दुसऱ्यांच्या विचारांची गुलामगीरी पत्करणारांमुळे समाजाला घेरणारे शिकारी निर्माण झालेले आहेत.स्वत:च्या कुटू़ंबात कुणीही लस न घेतलेल्या आणि डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ मध्ये मुंबई,पुणे,कोल्हापूर,सांगली,सातारा प्रवास करीत मुक्कामं,हॉटेलांनी जेवणं करणारा मी स्वत: आणि माझ्यासारखेच अनेकजण आहेत.परंतू तो कोरोना आमच्याजवळ कधीच आला नाही,कुठे दिसला नाही.म्हणून अनुभवाने परिस्थितीवर भाष्य करून "व्हायरस" शब्दांना घाबरून जाणाऱ्यांसाठी ही जागृतीपर वास्तवता समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.कारण आत्ताचाही व्हायरस बिलकूल गंभीर नाही. सर्दी पडशासारखा आहे, या संशोधक डॉक्टरांच्या म्हणण्याकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे.नाहीतर जो गंभीर नाही त्यालाही घातक म्हणून घाबरवणारे खिसेकापू या आरोग्यक्षेत्रात भुईछत्र्यांप्रमाणे उगवलेले आहे.अवैध औषधांचे काळेबाजार येथे भरत आहेत.कामोत्तेजक गोळ्यांनी धोका निर्माण करणारे आणि हरामाची माया कमावणारे फोफावलेले आहेत.गर्भपातांच्या गोळ्यांचा अवैध पध्दतीने उपयोग करून परिनामी आपल्याच महिलांचे जीव संकटात टाकणाऱ्या काही महिला स्त्री रोग तज्ञ सुध्दा येथे आपले गोरखधंदे उभारून बसल्या आहेत.त्याबाबतच्या चौकशा आता अकोला शहरातही सुरू झालेल्या आहेत.
मागील काळात येऊन गेलेला कोरोना समाजाच्या अंधविश्वासाला छेद देऊन गेलेला आहे.त्याने समाजाला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत.लूटारू आणि लबाडांचे परिचय करू दिलेत.आपल्या समाजातली आपलीच म्हणून ज्यांच्यावर आपण विश्वास टाकलेला असतो तूच कसे ठगवतात हे दाखविले आहे.त्यांनीच प्रसंगी आपल्या कशा फसवणुकी केल्या आहेत हे अनुभवासह सिध्द करून कोरोना गेलेला आहे.मग अशा संकट काळात कसे वागावे, किती धिरोदात्तपणे उभे रहावे, याचे महत्वपूर्ण धडे देणाऱ्या कोरोनामुळे समाज आर्थिक बाजूंनी तसा नागवला गेला.परंतू तरी तो लबाडांच्या अस्तित्वांना शह देऊन मात्र गेला.म्हणून तो आर्थिक माया जमवणारांचा मित्र होता. परंतू आमचाही तो छत्रू नव्हता. फक्त भिती दाखवून त्याचे विराट चेहरे स्केच करून समाजसमोर ठेवले गेले.त्यात कोणाचे राजकीय तर कोणाचे आर्थिक फायदे झाले.शेवटी कोणत्याही घटनेतील चांगल्या परिनामांसोबत त्याचे दुष्परिनाम सुध्दा जन्म घेतच असतात. येथे आपल्याच समाजातील बांधवांच्या कुटूबियांची भावनिक ब्लॅकमेलिंग करून त्यांना गरज नसतांनाही दवाखाण्यांमध्ये भरती करून घेणारे आहेत. मेलेल्या रूग्णांवरही औषधे आणि इंजेक्शनांचा मारा करणारे काही अनैतिक अस्तित्वात आहेत.त्यामुळे त्यांनी कोरोनाच्या संधीचे सोने करण्याचं व्यवहारीपण अंमलात आणलं.पण " ताबडतोब भरती करावं लागते...सांगणं आमचं कर्तव्य ते पाळणं तुमची जबाबदारी" अशा प्रकारचे घाबरवून देणारे मतलबी सल्ले आत्मसात करतांना सद्विवेक बुध्दी प्रथम जागवावी हे कोरोनाने चांगल्या प्रकारे शिकविले आहे. कोणताही निर्णय घेतांना एकदम घाई करू नये हे निर्वाणीचे संदेश तो देऊन गेला.म्हणून तो समाजालाही अनेक नव्या गोष्टी शिकवण्यासाठी आला होता.टाळ्या थाळ्या वाजवा सांगण्यासाठी नाही....! ही सकारात्मक बाजू लक्षात घेऊन नव्या व्हायरसला समाजाने घाबरू नये. औषधपचारासाठी बोटावर मोजण्याईतक्या चांगल्या,समाजशील,सेवाभावी डॉक्टरांकडेच जावे. कोरोनाप्रमाणे विनाकारण अनाचाऱ्यांना अधिक पोसण्याचा आततायीपणा करून मानसिक दडपणाने पश्चातापाचे मागील दिवस आता पुढे आणू नये...!
संजय एम.देशमुख,(निंबेकर ),अकोला
ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६
आपल्या प्रतिक्रिया द्या....