नवभारत राष्ट्रीय ग्यानपीठ संस्था, पुणे मार्फत आयोजित दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये सर्व शालेय, आणि महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक, सांस्कृतिक उल्लेखनीय उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबविले जातात. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, २०२२ ह्यावर्षी सुद्धा ऑनलाइन स्वरूपात संस्थेने सर्व उपक्रम घेतले. त्यातच "बुक ऑफ रेकॉर्ड" ह्या शैक्षणिक उपक्रमात, ब्रम्हपुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एम.ए- प्रथम वर्ष (आंबेडकर विचारधारा) ह्या विषयात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी उदयकुमार सुरेश पगाडे या उल्लेखनीय कामगिरी करत भारतातून सर्वोतम होण्याचा मान पटकाविला.
नवभारत राष्ट्रीय ग्यानपीठ संस्थेचे वतीने, पार्सल स्वरूपात पुरस्कार पाठवीत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी सिनेट सदस्य- ॲड.गोविंद भेंडारकर साहेब यांच्या हस्ते यूवा समाजसेवक उदयकुमार पगाडे यांना "नॅशनल रेकार्ड होल्डर प्राईड अवॉर्ड-२०२२" हा सन्मान देऊन गौरविण्यात आला. त्यांच्या ह्या उल्लेखनीय कार्याचा जिल्हाभरात कौतुक होत आहे.