कारंजा : आम्हीच बहुजनांचे फार मोठे कैवारी. आम्ही म्हणू ती पूर्वदिशा. असा पोकळ आव आणून समाजमाध्यमांवर हिंदु विरुद्ध व या धर्मातील विविध जाती जमातीच्या बहुजन समाजाच्या श्रध्देवर व त्यांच्या मुर्तिपूजेवर घातक टिका टिप्पणी करून स्वतःला फार मोठे समाज सुधारक समजून घेणारे, निच विचारांचे काही तथाकथित पांढरपेशे स्वतःला बहुजन नेते अंधश्रद्धा आणि नास्तिकतेचे पुजारी म्हणणारे हिंदु धर्माच्या नावाने कुटील राजकारण करून, समाजात केवळ कलह - द्वेषभावना - वादविवाद व जातियवाद पसरवित असून आतातर व्हॉटसप ग्रुप, व्टिटर,फेसबुक व अन्य समाज माध्यमांचा वापर सर्रासपणे हे नालायक नेते आणि नेत्यांचे चमचे करतांना दिसत आहेत तेव्हा स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग, गुप्तचर विभाग, सायबर शाखा आणि केन्द्र व महाराष्ट्र शासनाने या समाजात विष पसरावीणाऱ्या या नालायक जातियवाद्यांची दखल घेऊन यांच्यावर कडक कार्यवाही करणे गरजेचे आहे. हिंदु धर्म व या धर्मातील बहुजन हा समाज कधीही केव्हाही इतर धर्माचा विरोध करीत नाही. इतर धर्मियांविरुद्ध टिकाटिप्पणी करीत नाही परंतु हे जातियवादी नेते मात्र आपला भारत देश विविध धर्मिय, सर्व जातिय अनेक भाषिकांनी नटलेले सप्तरंगी रंगाच्या इंद्रधनुष्याप्रमाणे नटलेला हा देश आहे याचे भान न ठेवता आणि राष्ट्रिय समता, बंधुता, समानता, जातिय सलोखा न ठेवता राष्ट्रीय एकात्मतेला तडा देत असतात. हिंदु धर्म व या धर्मातील इतर बहुजन समाज हा मंदिरात धार्मिक विधी करो. गणेशोत्सव, दुर्गोत्सव करो,मुर्तिपूजा करो किंवा स्वतः च्या धार्मिकता आध्यात्मिकतेचा प्रचार प्रसार करो त्यामध्ये यांच्या बापाचे काय जाते ? तुम्ही हिंदुंधर्मीयांना व या धर्मातील विविध जाती धर्माच्या बहुजन समाजाला विरोध करण्याचे पाप का करता ? नास्तिकतेचा, अंधश्रध्देचा आणि खूप मोठे विद्वान पुढारी असल्याचा आव आणून हिंदूं धर्मिया विरुद्ध समाज माध्यमावर गरळ का ओकता ? यामुळे तुम्ही सामाजिक एकात्मतेचा विरोध करून,स्वतः तुमच्या निचपणाचे प्रदर्शन करीत आहात असे तुम्हाला वाटत नाही का ? तुमच्या या समाज घातकी कृत्याबद्दल जर तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही होऊन तुम्ही तडीपार झालात ? तुमच्यावर खटले दाखल झाले तर तुमचे चारित्र्यहनन होणार नाही काय ? याचा तरी तुम्ही विचार करायला हवा. असा परखड सवाल उपस्थित होत असून यांच्या समाज माध्यमावरील टिकाटिप्पणी पोस्टवर सायबर शाखा ,गुप्तचर विभाग , पोलिस प्रशासन व शासनाने करडी नजर ठेवावी. अशी मागणी गोंधळी या बहुजन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी शासनाकडे केली आहे.