वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : व्हॉईस ऑफ मिडिया ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना आहे. या संघटनेचे संस्थापक संदीप काळे आणि प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचे साठी आपत्कालीन परिस्थितीत विशेष अर्थ सहाय्य मिळावे अशी मागणी केली. या संदर्भात आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. नव्हे तर पत्रकारांसाठी विशेष बाब म्हणून त्यांच्या आरोग्य संदर्भात नक्कीच आमच्या कक्षाकडून भरघोस मदत मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आयुष्यमान योजनाआढावा बैठक संदर्भात १२ जानेवारी रोजी वाशिम येथे भेट दिली होती. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मिडिया चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्र शासनाची आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाच्या म. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची एकत्रित अंमलबजावणी करणारे आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे वाशिम दौऱ्यावर आले होते. . मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातून राज्यात डॉ. ओमप्रकाश शेटे यांना बोलवले आहे. डॉ. ओमप्रकाश यांनी केलेलं काम आणि मिळवलेल्या अनुभवाचा ते पुरेपूर वापर करत आहेत. यामुळे गरजू आणि सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण होताना स्पष्टपणे दिसत आहे.
मूळचे उद्योजक असलेल्या डॉ. शेटे यांनी आजवर केलेल्या रुग्णसेवेच्या कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा बघून व्हॉईस ऑफ मिडिया चे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, जिल्हा महासचिव धनंजय कपाले, विदर्भ कार्याध्यक्ष विठ्ठल देशमुख, इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग चे जिल्हाध्यक्ष किशोर गोमासे यांचेसह शहरातील मान्यवरांनी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. असे वृत्त आपणास मिळाले असल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
मित्राचे आजारपण ठरला टर्निंग पॉइंट
सुमारे १७-१८ वर्षांपूर्वी वर्गमित्राला रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. त्याच्यावरील महागड्या उपचारांसाठी निधी गोळा करताना या मार्गातील अडचणींना तोंड द्यावे लागले, तोच आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरून रुग्णसेवेचे व्रत स्वीकारल्याचे शेटे यांनी यावेळी सांगितले. तेव्हापासून ग्रामीण भागांतील गरीब रुग्णांना मुंबईत चांगले उपचार मिळावेत यासाठी मदत देणे सुरू केले. आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने स्वखर्चातून स्वयंसेवकांचे सुद्धा जाळे उभारल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मादाय रुग्णालयांवर वचक
सरकारकडून अल्पदरात जमीन, वीज, पाणी आणि कर सवलत मिळवणारी रुग्णालये "धर्मादाय "प्रकारात मोडतात. या रुग्णालयांचे नियमित इन्स्पेक्शन करून त्यांना गरजूंसाठी राखीव खाटा आणि मोफत उपचार करण्यास भाग पाडले. बड्या रुग्णालयांनी या माध्यमातून आजवर सुमारे ९०० कोटी हून अधिक रुपयांचे उपचार केल्याचे शेटे यांनी सांगितले.
रोज किमान ७०० रुग्ण मदतीसाठी मंत्रालयात येतात. त्या सर्वांना मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असतो.