कारंजा:- कारंजा पंचक्रोशीतील सुप्रसिध्द असलेल्या,मौजे उबंर्डा बाजार येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचा दि. १३ फेब्रुवारी रोजी, श्रींचा प्रगटदिन साजरा होताच, दुसरे दिवशी ५१ वर्षाच्या परंपरेप्रमाणे उंबर्डा बाजार येथून, पालखी पदयात्रा , टाळ मृदंग भजनी दिड्यांच्या गजरात, शेगावच्या दिशेने रवाना होणार आहे. तरी सालबाद प्रमाणे यंदाही, पंचक्रोशीतील जास्तित जास्त भजनी मंडळे, महिला व पुरुष टाळकरी मंडळीनी वारकर्याच्या ( पुरुष मंडळी पांढरा गणवेश पांढरी टोपी व महिला मंडळी पिवळी साडी किंवा नऊवार पातळ ) गणवेशात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मिळाले आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, ब्रम्हांडनायक श्री संत गजाननाची शेगाव नगरी ही विदर्भाची पंढरी असून श्रींच्या चरणी नतमस्तक होण्याकरीता, मुखाने श्रींचा जयघोष करीत पायी चालत जाण्याची वारकर्याची प्राचिन परंपरा आहे. आणि म्हणूनच दरवर्षी उंबर्डा बाजार येथून संत गजानन महाराज संस्थान व उंबर्डा बाजार निवासी गावकरी व वारकरी मंडळी कडून पालखी पदयात्रा काढण्यात येते. यावर्षी कोव्हिड १९ कोरोना महामारिचे महासंकट संत गजाननाच्या कृपेने टळल्यामुळे आणि संचारबंदी काढण्यात आल्याने वारकरी मंडळी मध्ये नवचैत्यन्य असून, मंगळवार दि.१४ फेब्रुवारीला पालखी निघणार असून सर्वप्रथम स्वगृही नगर परिक्रमा होऊन पालखी मार्गस्थ होईल. पालखी सोहळ्यामध्ये विणेकरी हभप अवधुत महाराज रनमाळे, हभप संभाजी महाराज उताने, पालखी पुजारी कडू आजीबाई, गायनाचार्य हभप दिलीप महाराज ससाने मनभा, हभप सुरेश महाराज दिघडे , हभप रवी महाराज गुव्हाडे, हभप पंकज महाराज हळदे, हभप राहुल महाराज घोडे, हभप गोपाल महाराज हळदे,हभप शुभम महाराज गोटे, हभप त्र्यंबक महाराज जाधव, पालखी वाहक हभप हळदे महाराज, हभप दिघडे महाराज, हभप गावंडे महाराज हे राहतील. पालखी पदयात्रेत दिलीप वाघमारे हे जलव्यवस्थापक राहतील ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पहातील . दि १४ फेब्रुवारी रोजी दुपारचे भोजन अजय पचगाडे यांचेकडून तर रात्रीचे भोजन व मुक्काम किरण चौधरी कामठवाडा यांचेकडून होईल.दि १५ फेब्रुवारी रोजी बबनराव भागवत, चरण चव्हाण, विनायक पचगाडे यांचेकडून चहापान, दुपारी संत नामदेव महाराज संस्थान मधुकर महाराज मापारी यांचेकडून दुपारचे भोजन, चहापान - सुनिल माकृवार भारतीपूरा, भगवानदास खेमवानी, सागर खेमवानी सिंधी कॅम्प, मुरलिधर घुले कांचनविहार, धनसकर जुडवा हनुमान मंदिर, गणेश खंडागळे खेर्डा, रात्रीचे भोजन व मुक्काम आनंदराव राउत ; दि. १६ फेब्रुवारी सकाळ्चे चहापान शाम राऊत, सुनिल वानखडे, सुनिल पाचडे दहातोंडा दुपारचे भोजन नागोराव वाकोडे जामठी, दुपारचे चहापान राजू दुरतकर, राजुभाऊ ठाकरे, रामदास खोलगडे, सरोदे, रात्रीचे भोजन व मुक्काम, विवेक पातोंड, संत पुंडलिक बाबा संस्थान मुर्तिजापूर ; दि. १७ फेब्रुवारी सकाळचे चहापान फराळ राजु अवघाते, सुरेश डोईफोडे गोरेगाव ; दुपारचे एकादशी फराळ अशोक खराटे, मोहने गाजीपूर, दुपारचे चहापान श्री गजानन महाराज मंदिर कौलखेड फाटा, रात्रीचे फराळ व मुक्काम गजानन पटले पळसो बढे ; दि १८ फेब्रुवारी सकाळचे चहापान ऋषिकेश गावंडे, दुपारचे फराळ दत्ता तायडे, अरुण देवर, दिनकर मसाये सांगळूद खुर्द ; दुपारचे चहापान अग्निवेश आदिमाय शक्ती यावलखेड, रात्रीचे महाशिवरात्रीचे फराळ व मुक्काम विनोद पावडे गुळदी ; दि १९ फेब्रुवारी रामकृष्ण घोडे, सुनिल गिर्हे, उकंडराव सोनोने, दुपारचे भोजन नानाभाऊ उजवणे अॅड मुंगी रामदास पेठ अकोला, दुपारचे चहापान ऐश्वर्या जनरल स्टोअर्स डाबकी रोड, रात्री भोजन व मुक्काम माणिकराव साबळे श्री गजानन नगर डाबकी रोड अकोला; दि २० फेब्रुवारी सकाळचे चहापाणी राजू मारोतराव कोरकने व साबळे , वाघ, राजू वानखडे, दुपारचे भोजन श्री महादेव मंदिर भागवत मंडळी, दुपारचे चहापान बानेरकर निमकर्दा, रात्री भोजन व मुक्काम रवी महाराज श्रीराव चमत्कार मंदिर कसूरा ; दि. २१ फेब्रुवारी सकाळचे चहापान रवी महाराज श्रीराव कसुरा, दुपारचे भोजन जय गजानन कृषी बचत गट उंबर्डा बाजार, दुपारचे चहापान गजानन महाराज मंदिर उंबर्डा बाजार तर्फे, रात्री भोजन व मुक्काम श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव आनंद विहार विसावा. येथे पालखी पदयात्रा पोहचेल . श्रींचे दर्शन घेऊन व संत गजाननाचा महाप्रसाद घेऊन तेथे पदयात्रेचे विसर्जन होऊन वारकरी परत उबंर्डा बाजारच्या दिशेने प्रस्थान करतील. असे वृत्त पालखी प्रमुख रवी महाराज श्रीराव, पालखी मार्गदर्शक हभप राहुल महाराज घोडे, राजुभाऊ घोडे, सुनिल पाटील वानखडे, दिलीप लोहाणा, प्रमोद भोयर, भगवानदास खेमवानी, भनक कारखेडा यांचे कडून संजय कडोळे यांना कळविण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....