ब्रह्मपुरी: भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द प्रकल्प हा चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यासाठी वरदान ठरत आहे शिवाय या प्रकल्पाचे पाणी भूती नाल्यात सोडल्यास ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन किन्ही बेटाळा बोडेगाव पारडगाव उदापूर बोरगाव येथील जनतेला शेतीसाठी, जनावरांसाठी व इतरत्र वापरासाठी पाणी सोयीचे होणार आहे शिवाय या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे यासंदर्भात आपण मागणीसुद्धा केली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश दर्वे यांनी पत्रकात म्हटले आहे
मुख्यत्वे उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरगुती कुटुंबात पाण्याचा वापर जास्त होत असते त्यामुळे पाण्याची जास्त जास्त गरज भासते तर उदापूर, बोरगाव बेटाळा पारडगाव रनमोचन किन्ही येथील ग्रामपंचायती मधून पारद गावाजवळून-रनमोचन वैनगंगा नदीकडे वाहत जाणाऱ्या भूती- नाल्यांमध्ये पाण्याचे स्त्रोत म्हणून विहिरी बनविण्यात आल्या आहेत व त्यातून गावात पाणीपुरवठा केल्या जातो मात्र उन्हाळ्याच्या दिवसात नदी-नाले कोरडे पडत असल्याने गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होईल निश्र्चितच नळ योजनच्या माध्यमातून पाणी गावात पुरवठा करताना लोकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी भूती नाल्यात सोडल्यास ब्रह्मपुरी तालुक्यातील बऱ्याच गावांतील शेतकरी वर्ग व जनतेला याचा फायदा होईल अशी मागणी ब्रह्मपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश दर्वे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे मंत्री महोदयांनीयासंदर्भात गोसीखुर्द प्रकल्पाला निवेदन दिले असूनगराडी नाल्याला पाणी सोडून मालडोंगरी येथील पाणी समस्या सुद्धा लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचे सुरेश दर्वे यांनी म्हटले आहे