कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)- अहिंसेच्या भारत देशात सकल दिगंबर जैन समाजाच्या आस्थाचे केंद्र असलेले प्रसिद्ध जैन संत प पु.गणधर आचार्य कुंथुसागरजी महाराज यांचे प्रभावक शिष्य प पु आचार्य कामकुमारनंदी मुनि महाराज यांचे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुड आश्रमातुन दि. 5 जुलै रोजी काही समाज कंटकांकडून अपहरण करून शरीराला करंट देऊन निर्मम हत्या करण्यात आली. या कायरतापूर्वक घटनेने देशातील जैन समाज भयभीत झाला असुन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी व जैन धर्म ,जैन तीर्थक्षेत्र,जैन साधू संत व जैन समाज यांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.कारंजा तहसिलदार यांचे मार्फत केंद्र व कर्नाटक सरकारला एका निवेदनाद्वारे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्याकरीता,सकल जैन समाजाने दि. 18 तारखेला काढलेल्या भव्य मुकमोर्चाच्या माध्यमातून केली आहे.

तत्पूर्वी सकाळी 11 वा. गुरू श्री. देवेंद्र किर्ती सभागृहात प पु ज्ञेयश्री माताजी यांचे उदबोधन झाले यावेळी माताजी म्हणाल्या की झालेली घटना अतिशय निंदनीय व दुर्दैवी आहे महाराजांची तर घटना होऊन गेली पण भविष्यात कोणत्याही धर्माच्या साधुसंतांच्या बाबतीत अश्याप्रकारच्या घटना होता कामा नये आणि देशभरात जिथे जिथे जैन साधुसंत जैन मंदिरात विराजमान आहेत त्यांचे ही संरक्षण झाले पाहिजे प्रथम जवाबदारी हि तर समाजाचीच आहे परंतु सरकारच्या माध्यमातून ही अश्या प्रकारची सुविधा होणे आवश्यक आहे. तहसीलदाराला निवेदन देण्याची औपचारिकता न ठरता वरिष्ठ पातळीवरून योग्य ती दखल घेतल्या गेली पाहिजे असे ही स्वाध्वीजी म्हणाल्या.
जैन स्वाध्वी वात्सल्यनिधी श्रमणी आर्यिका प पु ज्ञेयश्री माताजी व बाल ब्रह्मचारी भारती दीदी यांच्या सान्निध्यात मुकमोर्चाला प्रारंभ झाला.हा मोर्चा भगवान महावीर चौक येथुन निघुन महात्मा फुले चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे नेहरू चौक,जयस्तंभ चौक मार्गे कारंजा तहसील कार्यालयावर पोहोचला . तिथे नायब तहसीलदार हरणे साहेब यांनी तहसीलदाराच्या वतीने सकल जैन समाजाच्या वतीने राजाभाऊ डोणगावकर, शिरिषभाऊ चवरे,निनाद बन्नोरे , अविनाश खंडारे,जगदीश भाऊ चवरे,प्रसन्न आग्रेकर,हितेंद्र गंधक,भारत हरसुले,अविन नांदगावकर,निरंजन वैद्य,दिलीप उन्होने,प्रज्वल गुलालकरी,सतीश भेलांडे यांचे हस्ते निवेदन स्वीकारले.
भ .महावीर चौक स्थित श्री. गुरु देवेंद्रकिर्ती सभागृहात अँड संदेश जिंतुरकर यांनी निवेदनाचे वाचन केले.तर किरण चवरे यांनी संचलन व आभारप्रदर्शन केले. तर तहसील कार्यालयावर सभेचं संचलन व आभारप्रदर्शन भारत हरसुले यांनी केले
मोर्चा यशस्वी करण्यासाठी हितेश रुईवाले,सुदेश गुळकरी , सतिश भेलांडे,दिलीप उन्होंने, प्रसन्ना आग्रेकर,निरंजन वैद्य, शितल देवडा,हितेंद्र गंधक,पंकज जैन,गणेश धुरावत यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.
यावेळी या मोर्चात बहुसंख्य सकल जैन व अजैन समाज बांधव व भगिणी उपस्थित झाल्या होत्या.
आपल्या प्रतिक्रिया द्या....