बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकोला ते दर्यापूर मार्गावर अंबिकापुर नजीक कार दुचाकी अपघात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी दरम्यान घडली या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दर्यापूर कडून अकोला कडे जाणारी कार क्रमांक एम एच 31 सी आर 8378 ही जात होती तर अकोला कडून मोटारसायकल क्रमांक एम एच 30 सी 6662 आपल्या दुचाकीवरून गावी भटोरी येथे राजेंद्र महल्ले (वय 50) हे जात होते दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार व दुचाकी यामध्ये अपघात झाला, या अपघातात राजेंद्र महल्ले हे गंभीर जखमी झाले होते, दरम्यान अपघातानंतर सदर कार चालक घटस्थळावरून पसार झाला, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजय खंदाडे, हेडकॉन्स्टेबल दिपक कानडे सह पोलिसांनीघटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून सदर जखमीस अकोला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, वृत्त लिहिस्तोर पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती पुढील तपास ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत