कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी स्थानिक विश्राम गृह,कारंजा येथे दुपारी 2 वाजता कारंजा तालुक्यातील उपस्थित नवनियुक्त भाजपा पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न झाला.भाजपा वाशीम जिल्हाध्यक्ष सर्वश्री शामभाऊ बढे यांनी जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष व ईतर पदाधिकारी जाहिर केल्याचे वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री आ. रणधीरजी सावरकर, विभागीय संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सचिव सुरेश बनकर ,आ. राजेंद्र पाटणी यांच्या मान्यतेने भाजपा कार्यकारणी जाहीर केली.त्यात कारंजा तालुक्यातील समावेश असलेल्या नवनियुक्त भाजपा पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कारंजा तालुका भाजपा अध्यक्षपदी डॉक्टर राजीव काळे आणि आणि भाजपा शहराध्यक्षपदी ललित चांडक यांची फेरनिवड झाली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारणी घोषित झाली असून यामध्ये कारंजा तालुक्यातून उपजिल्हाध्यक्ष अनिल कानकिरड यांची फेरनिवड, सचिव सौ. मेघाताई बांडे, श्रीकृष्ण पाटील मुंदे, उत्तर भारतीय सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी ललित तिवारी,भटक्या विमुक्त आघाडी च्या जिल्हाअध्यक्ष पदी रामकिसन चव्हाण , सांस्कृतिक सेलच्या संयोजक पदी गिरीश जिचकार यांची निवड झाली तसेच ईतर पदाधिकारी यांची निवड झाली.

या सत्कार समारंभ कार्यक्रमात उपस्थित नव नियुक्त वरील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या सत्कार समारंभाला उत्तर देताना वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनोगतात विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटनी , जिल्हा अध्यक्ष शाम बढे यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले. कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहर भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्राजक्ता माहितकर, सविता काळे, पायल तिवारी, रजनी राऊत, पिंकी शुक्ला, विभा सुराणा,शशी वेळूकर,संजय भेंडे, राजीव भेंडे,, दिनेश वाडेकर ,संकेत नाखले, मंगेश पाटील धाने,सविज जगताप,शुभम बोनके, जिग्नेश लोढाया, अक्षय देशमुख ,मोहन पंजवानी, गजानन ढोकणे, प्रवीण भेंडे, कुलदीप अवताडे, राजू घोडे, राजु गाढवे, बिजवे अमोल, सुभाष कदम, संजय लाहे, परमेश्वर आमले,चेतन भेंडे, उमेश माहीतकर, गजानन अडसपुरे, देशमुख प्रसाद,अजय देवरनकर, प्रकाश ढेरे, विवेक साबळे, अशोक रोकडे, सुरेश गिरमकार, तुकाराम खोडे, निलेश वैद्य, पोहा येथील दिगांबरभाऊ, शंकर पवार, गजानन बसोले, रामराव राठोड, मधुकर चव्हान, मुंगुटपुर येथील पाटिल, इत्यादीसह अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन , आभार संजय भेंडे आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी केले. असे वृत्त संजय भेंडे यांनी दिले असल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....