कारंजा - इंझा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी विविध घोषवाक्याच्या गजरात प्रभातफेरी उत्साहात काढण्यात आली.सर्वप्रथम जि.प.शाळा इंझा च्या प्रांगणातून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली.
नंतर लगेच आरोग्य उपकेंद्र इंझा येथे.श्री उमेश पवार यांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्रातील ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगीआरोग्य सेवक काळे,मुख्याध्यापक अनिल पागृत, प्रकाश पाटील नाखले,अजय चव्हाण, विजय ढोके,कु माधुरी सवने,अंगणवाडी सेविका सौ भगत ताई,सौ.शालू ताई भोयर सौ. ज्योत्सना ताई ठाकरे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
बुद्धविहार येथे शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीसूर्य जोतीबा फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले.या प्रसंगी युवा नेते गणेश बागडे,मुख्याध्यापक,शिक्षक,आरोग्य कर्मचारी,ग्रा.प सदस्य,समाज बांधव व गावकरी मंडळी उपस्थित होती.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून हारार्पण करण्यातआले.युवा नेते तथा माजी सरपंच संकेत पाटील नाखले आणि प्रकाश पाटील नाखले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
ग्रामपंचायात कार्यालय या ठिकाणी नव निर्वाचित सरपंच सौ राधिकाताई संकेत नाखले यांच्या हस्ते ध्वज पूजन करून प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
शेवटी जि.प शाळा इंझा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यातआली ध्वज पूजन करून प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक अनिल पागृत यांच्या हस्ते करण्यातआले.याप्रसंगी सरपंच सौ.राधिकाताई नाखले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ जोत्स्नाताई ठाकरे,माजी सरपंच संकेत पाटील नाखले,युवा नेते तथा सामाजिक कार्यकते गणेश बागडे,शिक्षक वृंद,आरोग्य कर्मचारी,तलाठी,अंगणवाडी कर्मचारी आणि गावातील उत्साही नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या जागतिक संकटानंतर प्रथमच शाळेमध्ये विविध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यातआले.शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठपणे विविध गितावर नृत्य सादर केले.रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करतांना बाल कलाकारांनी उपस्थित गावकर्यांची मने जिंकून घेतली.मोठ्या प्रमाणात गावकर्यांनी बक्षिस देऊन विद्यार्थ्याचे कौतूक केले.कार्यक्रमाचेआयोजन, नियोजन आणि सूत्रसंचालन अजय चव्हाण यांनी केले.मुख्याध्यापक अनिल पागृत यांच्या मार्गदर्शनाखाली कु.माधुरी सवने व विजय ढोके यांनी कार्यक्रम पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली. असे वृत्त संकलन संजय कडोळे यांनी केले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....