कारंजा (लाड) : हल्ली सणासुदीच्या दसरा दिवाळीच्या दिवसांचा आणि महत्वाचे म्हणजे नवरात्री- नवदुर्गा उत्सवाचा, विचार न करताच,मंदगतीने विकासाची कामे राबविणाऱ्या स्थानिक प्रशासनाने,कासवगतीने रस्त्याच्या सिमेंट बांधकामाची कामे सुरु केलेली आहेत. त्यामध्ये,श्री नवदुर्गा विसर्जन मार्गावरील,स्थानिक श्री दत्त मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करण्याकरीता परंतु ऐन नवरात्री नवदुर्गा उत्सव काळातच,रस्ता खोदून ठेवण्यात आला. त्यावर सध्या थातुरमातूर दगडधोंडे टाकून, कोणतीही दबाई न करताच कच्च्या मुरुमाचा थर देण्यात आला.रस्त्याच्या या कामामुळे मार्गावरील नळाचे पिण्याचे पाण्याचे कनेक्शन तोडून टाकले आहेत तसेच त्यामुळे नळाचे पाणी,सांडपाण्याच्या नालीचे घान पाणी रस्त्यावर येत असून दुर्गंधी पसरली आहे. *"महत्वाचे याच मार्गात कासार ओळीतील प्राचिन श्री जगदंबा देवी मंदिर,व इतरही मंदिरे,अमर चौकातील कालींका नवदुर्गा, पहाडपुऱ्यातील नवदुर्गा व टिळक चौकातील नवदुर्गा स्थापना झालेली आहे त्यामुळे दर्शनाला येणारे भाविक महिलमंडळी व पुरुष या मार्गातून ये जा करत असल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नवदुर्गा विसर्जना पूर्वी तर हा रस्ता तयार होऊच शकत नाहीत. त्यामुळे ओबडधोबड रस्त्याची मरम्मत करून,श्री नवदुर्गा विसर्जनानंतर चांगली गिट्टी टाकून, रोलरने दबाई करूनच सिमेंट बांधकाम व्हायला हवा आहे.तसेच शहरातील प्रमुख मार्गावरील रस्त्याच्या या शोकांतीकेकडे अधिकारी व स्थानिक नेते मंडळी यांनी लक्ष्य द्यायला हवे असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.