गुन्हे घडविण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ देशी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी कट्ट्यासह पाच हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.संतोष उर्फ कुट्टी राजकूमार रॉय (वय 19) रा. घुग्घूस असे आरोपीचे नाव आहे.
बुधवारी (दि. २४) आरोपी संतोष उर्फ कुट्टी राजकूमार रॉय (वय 19) हा घुग्घूस येथील आपल्या घरी देशी कट्टा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. महेश कोंडावार यांनी पो. उप नि. विनोद भुरले, पो.हवा संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. संतोष येलपुलवार, पो.कॉ.गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांचे पथक नेमून कारवाई केली. आरोपी संतोष उर्फ कुट्टी राजकूमार रॉय याचे बँक ऑफ इंडीया मागे वार्ड नं.03 घुग्घूस येथील त्याचे घरी जावून त्याची झडती घेतली. त्याचे घरात एक देशी कट्टा व पाच हजार रुपये आढळून आले. आरोपी विरुद्ध पो.स्टे. घुग्घूस येथे अप.क्र. 360/2023 कलम 3 25 भा. ह. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पुढील तपास कामी पो.स्टे. घुग्घूस यांचे ताब्यात देण्यात आले.