वाशीम : दरवर्षी राजस्थान येथील माऊंट पर्वतरांगेतील आबू रोड येथील शांतिवन कॅम्पस मध्ये माध्यम क्षेत्राशी संबंधीत प्रिन्टमिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया, प्रेस फोटोग्राफर व पत्रकारांचे अखिल भारतिय स्तरावरील महासंमेलन आयोजीत करण्यात येत असते. त्यासाठी कारंजा (लाड) येथील ब्रम्हाकुमारीज केन्द्राच्या संचालिका राजयोगीनी ब्र. कु. मालती दीदी यांच्या मार्गदर्शानुसार, समन्वयक डॉ. निखील कटारिया हे ब्रम्हाकुमारी परिवाराचे स्थानिक ज्येष्ठ पत्रकार संजयभाऊ कडोळे,प्रा.अशोकराव उपाध्ये, प्रदिप भाई वानखडे यांच्या माध्यमातून निवडक इच्छुकांना मिडीया कॉन्फरन्स करीता घेऊन जात असतात.त्यानुसार येत्या दि . 26 ते 30 सप्टेंबर 2025 करीता ब्रम्हाकुमारीज कारंजा परिवारातर्फे पत्रकार जाणार असल्याची माहिती कारंजा येथील राजयोगीनी ब्र. कु. मालती दीदी यांनी दिली असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी दिली आहे. या संदर्भांत सर्व मिडीया कर्मी पत्रकारांच्या माहिती करीता अधिक वृत्त असे की,शांतिवन कॅम्पस येथे मीडिया विंगच्या सौजन्याने राष्ट्रीय मीडिया महासम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. हे महासम्मेलन दिनांक 26 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार आहे.
या वर्षीच्या महासम्मेलनाचा विषय आहे – “समाजात शांती, एकता आणि विश्वास प्रस्थापित करण्यासाठी माध्यमांची भूमिका” (Role of Media for Promoting Peace, Unity & Trust in Society).
या परिषदेत देशभरातून माध्यम क्षेत्राशी संबंधित विविध प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये वृत्तपत्र व मासिकांचे मालक, प्रकाशक, संपादक व संवाददाता, रेडिओ व टीव्ही चॅनेल्सचे सीईओ, डायरेक्टर, कार्यक्रम अधिकारी व पत्रकार, माहिती मंत्रालयाचे अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, न्यूज एजन्सीचे प्रतिनिधी, मीडिया प्राध्यापक व विद्यार्थी, लेखक, स्क्रिप्ट रायटर, चित्रपट निर्माता, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, सोशल मीडिया तज्ज्ञ, पब्लिकेशन व प्रिंटिंग प्रेस प्रतिनिधी, चित्रपटगृह संचालक, केबल ऑपरेटर तसेच टपाल विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे.
या महासम्मेलनात अंदाजे 1500 मीडियाकर्मी तसेच 300 बीके सेवाधारी सहभागी होणार असून मीडिया प्रतिनिधींसोबत त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी व 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले) देखील सहभागी होऊ शकतील.
परिषदेत सहभागी होण्यासाठी पाहुणे, गाईड्स तसेच बीके सेवाधारी यांची ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
तरी देखील,नोंदणीसाठी आपल्या स्थानिक ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात संपर्क साधावा असे डॉ सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक मीडिया प्रभाग माउंट आबू यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
बी.के. शांतनु भाई (राष्ट्रीय संयोजक, मीडिया विंग)
???? 9414156615 / 9928756615 / 7023706615
✉️ Email : mediawing@bkivv.org यांचेशी संपर्क साधावा असे वृत्त ब्रम्हाकुमारीज कारंजा परिवाराचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....