तालुक्यातील कुचना गावाजवळ असलेल्या पाटाळा रोड वर असलेल्या नागलोन पुलाच्या बाजूला एक अज्ञात इसमाचा मृतदेह काल दुपारच्या सुमारास आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.अज्ञात इसमाचे वय अंदाजे 52 च्या दरम्यान आहे. वर्ध नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या पाटाळा गावाच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असून असून त्याच मार्गावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने हा घातपात असल्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलीस विभागाद्वारे बोलल्या जात आहे,.ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळला तिथे असणाऱ्या पुलाला रक्ताचे डाग लागले आहेत तसेच मृतदेहाचा डोक्यावर तीन तीक्ष्ण जखम आहे तसेच कान तीन इंच कापलेल्या अवस्थेत असून ,गळ्याभोवती नखांचे वर्ण आढळून आल्याने पोलीस हत्याच्या दिशेने तपास करणार असल्याचे दिसून येत आहे, प्राप्त माहिती नुसार मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर सत्यता बाहेर येणार असल्याचे बोलले जात आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी हजर झाले असून पुढील तपास सूरु आहे .पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर च सत्य बाहेर येईल अशी नागरिकांना आशा आहे.