युवारंगचा समर कॅम्प म्हणजे विद्यार्थ्यांमधिल सर्वांगीण विकासात भर पाडणारा उपक्रम:-पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे
आरमोरी:-
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवारंगचा शैक्षणिक क्षेत्रात असलेले योगदान हे उल्लेखनीय आहे, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सामाजिक पैलूंचा अभ्यास व्हावा व सर्वागीण विकास साधता यावा आणि विद्यार्थ्यांना सुप्त गुणांचा विकास करता यावा यासाठी प्रयत्नशील असणारी संस्था म्हणजे युवारंगचा समावेश होतो,युवारंगचा समर कॅम्प म्हणजे विद्यार्थ्यांमधिल सर्वांगीण विकासाला चालना देणारा उपक्रम आहे युवारंग तर्फे आयोजित केलेल्या समर कॅम्प चा विद्यार्थ्यांनी भरपूर फायदा घ्यावा व आपल्यातील सुप्त गुण बाहेर काढावे आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना लहान वयातच बँकिंग ,शेती, शरीर विज्ञान व इतर विषयाची माहिती असणे आवश्यक आहे ही माहिती या समर कॅम्प च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाणार त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा .असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे पोलीस स्टेशन आरमोरी यांनी समर कॅम्पच्या उदघाटन सोहळ्यात केले.
सामाजिक ,सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक व अन्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम घेणाऱ्या युवारंगतर्फे आज दिनांक २६ एप्रिल २०२२ ला सकाळी ठीक ७:०० वाजता युवारंग निशुल्क समर कॅम्प चे उद्घाटन करण्यात आले या समर कॅम्प मध्ये कॅम्पुटर, योगा ,कराटे, पथनाट्य, नृत्यकला , गायन कला, ऑनलाईन बँकिंग ,शरीर विज्ञान , कराटे , आयुर्वेद , कृषी सहल , चित्रकला ,टाकाऊ पासून टिकाऊ बनवणे, व्यक्तिमत्व विकास, वन्यजीव, क्रीडा ( कबडी, खो-खो, फुटबॉल क्रिकेट ,रग्बी ) हे विषयी शिकवले जाणार आहेत आजच्या उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. देवानंदजी दुमाने अध्यक्ष- वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था, आरमोरी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. मनोजजी काळबांडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आरमोरी ,प्रमुख अतिथी म्हणून मा. श्रीपाद वटे सर प्राचार्य स्वामी विवेकानंद विद्यालय ,आरमोरी , मा .केशवजी कवंडर सर प्राचार्य पॅराडाईज कॉन्व्हेंट स्कूल ,आरमोरी, मा. विनोदजी निमजे साहेब सामाजिक विचारवंत, आरमोरी मा. राहुलजी जुआरे अध्यक्ष ,युवारंग परिवार आरमोरी उपस्थित होते याप्रसंगी मंचावरून उद्घाटन मार्गदर्शनात मा. देवानंद दुमाने यांनी युवारंग तर्फे विविध क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याची जाण विद्यार्थ्यांना करून दिली इतर शहरात अश्या प्रकारच्या समर कॅम्पसाठी पालकांना हजारो रुपये मोजावे लागतात मात्र युवारंग तर्फे मागील ४ वर्षांपासून आरमोरी शहरात निशुल्क समर कॅम्पचे आयोजन केले जाते या समर कॅम्पचा विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद घ्यावा असे मार्गदर्शन केले याप्रसंगी युवारंग चे सर्व सदस्य व समर कॅम्प मधील सहभागी विद्यार्थी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रफुल खापरे ,प्रास्ताविक राहुल जुआरे ,यांनी तर आभार अजय कुथे यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....