अकोला - 20 मार्च 2025 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडेरेशनचे सर्व कर्मचारी एक दिवसाच्या संप पुकारला असता सफलता पूर्वक संप पूर्ण कऱण्यात आले.हे सर्व कर्मचारी ऑल इंडिया बैंक एम्प्लॉईज असोसिएशन या देशव्यापी संघटनेला संलग्न आहेत. या संपात सर्व लिपिक व शिपाई कर्मचारी सहभागी झाले.. आपल्या विविध मागण्यांसाठी संपाच्या अगोदर विविध आंदोलन कार्यक्रम मागणी दिवस पाळणे, सर्व झोनल ऑफिस समोर निदर्शने व निवेदन देणे, बँकेच्या मुख्य कार्यालयात धरणे व निवेदन देणे, सोशल मीडिया मोहीम, स्वाक्षरी मोहीम ई. कार्यक्रमाद्वारे बँक व्यवस्थापनाला विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करून निवेदने दिली पण बँक व्यवस्थापनानी संघटनेच्या मागण्या मान्य केल्या नाहीत नाईलाजाने सर्व कर्मचाऱ्यांना संपावर जावे लागले आहे. संपामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या खालील प्रमाणे आहेत - 1. टेंपररी पीटीएस ना सामावून घेऊन पीटीएसची भरती., 2. सब स्टाफ आणि लिपिक संवर्गात पुरेशी भरती, 3. करारानुसार विशेष सहाय्यक पदे भरणे, 4. द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करणे, 5. संघटना कार्यालये संघटनांना पुन्हा उपलब्ध करून देणे, 6. डी-ज्यूरे कराराचे काटेकोर पालन करणे.

वरील मागण्यांमध्ये सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची भरती हा प्रमुख मुद्दा आहे. बँकेत सफाई कर्मचारी दैनंदिन तत्वावर मागील 10-15 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांना बँकेत सेवेत नियमित करण्याची मागणी असताना त्यांचे आऊटसोर्सिंग करण्यात येत आहे तसेच त्यांना किमान वेतन देखील दिले जात नाही. बँकेत लिपीकीय कर्मचाऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. परिस्थिति एवढी भयावह आहे की कर्मचाऱ्यांना आजारी असतांना सुद्धा काम करावे लागत आहे. कायम स्वरुपी कामगारांचे फायदे जसे की रजा, मेडिकल, सुट्ट्या काहीच मिळत नाही. या पदावर अनेक वर्षांपासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत.
कर्मचारी कमी असल्यामुळे याचा ग्राहक सेवेवर देखील विपरीत परिणाम होत आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढली आहे, त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यासाठीच कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की बँकेने त्वरित सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची पुरेशी भरती करावी.
याशिवाय कमी कर्मचाऱ्यात अधिक काम, यात बँकेचे नियम काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत आणि त्यातूनच फ्रॉडस होण्याची शक्यता निर्माण होत आहेत. यात बँकेचे तसेच ग्राहकांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण ?
आज महाबँकेतील कर्मचाऱ्यांनी संपाच्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्र, झोनल ऑफिस अकोला समोर सकाळी 11:00 बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सहभागातून प्रखर निदर्शने केली ज्यात 70 च्या वर कर्मचारी सहभागी झाले होते. यानंतर झालेल्या सभेत बोलताना संघटनेचे पदाधिकारी प्रवीण महाजन यांनी असे सांगितले की आजच्या दिवशी क्लार्कच्या, शिपाई तसेच सफाई कामगारांच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात अशी संघटनेची मागणी आहे. महाबँकेच्या ग्राहकांनी आमची भूमिका समजून घ्यावी आणि आमच्या संपाला पाठिंबा द्यावा असे संघटनेतर्फे नम्र आवाहन करण्यात आले आहे. हा धरणे कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज असोसिएशन चे अध्यक्ष शाम माईणकर, सतीश धुमाळे, शैलेन्द्र कुलकर्णी, शुभांगी मानकर, पूनम अग्रवाल, शिल्पा ढोले, प्रांजली निबंधे, राधा वानखेडे, प्रियंका, सुषमा महल्ले, अनूश्री, रक्षदा, योगेश आढाव, संजय फिरके, श्याम वानखेडे, किशोर आलेकर, अविनाश आखरे, विशाल गायकवाड, चैतन्य राजूरकर, रामेश्वर बागडे, सुधाकर पाटील, प्रफुल नारखेडे, मंगेश शामतकर, सुमित ठाकरे, संतोष गायकवाड, देवलाल शिरसाट, विजय तायडे, शिवराज पाटील, शुभम लांडे, जितेंद्र येळमे इत्यादी सहित जवळपास 70 पेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....