पोंभूर्णा तालुक्यातील चेक फुटाणा इथे शेतकरी जंगला लगत असलेल्या शेतशिवरात घरच्या शेळ्या चराई करीत असताना त्याचेवर झुडपात बसून असलेल्या रानटी डुकराने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. हि घटना शुक्रवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मोहन जवादे वय (४२) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारला सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू होता. दुपारच्या सुमारास पाऊस बंद झाल्यानंतर स्वतःच्या घरचे शेळ्या घेऊन जंगला लगत असलेल्या शेतशिवारात शेळ्या राखत असताना अचानक मोहन जवादे यांचेवर डुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले.