कारंजा (लाड) अन्नदाता शेतकर्याने पेरणी करून ते आभाळाकडे टक लावून पहात असतांनाच आज कारंजा पंचक्रोशीत, वाटेल तसा धुवाँधार पाऊस बरसला. त्यामुळे परिसरातील नाले आणि पांदण रस्त्याने अक्षरशःपाण्याचे लोंढे वाहू लागले.यावेळी अनेक शेतकरी शेताकडून आपल्या गावी,आपल्या घरी,परतत पांधन रस्ताने परतत असतांना, येवता (बंदीचे) शेतकरी सुद्धा आपल्या बैलबंडीने घराकडे जात होते परंतु अचानक पांधण रस्तात नाल्याचे पाणी वाढल्यामूळे त्यांची बैलगाडी वाहात जाऊन पलटी झाली.यात एकूण तीन लोक होते. त्या पैकी एक विष्णू महादेव हागोने मय्यत झाले व दोन शेतकरी वाचले असल्याची माहिती सास कंट्रोल रूमच्या श्याम सवाई यांना सास कर्तव्य सेवक मंगेश हिरळे यांनी माहिती दिली असून त्यांना उप जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात येत असल्याचे वृत्त कळवीले आहे.