जिल्ह्यात मानवावर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. अहेरी तालुक्यात अस्वलाने इसमावर हल्ला करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. व्येंकटी पापया चौधरी (६०) रा. गुड्डीगुड्म असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.
व्येंकटी पापया चौधरी हे आज शुक्रवार १६ सप्टेंबर ला सकाळच्या सुमारास जंगल परिसरात शेळी चारण्याकरिता गेले होते. दरम्यान जंगलात ठान मांडून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला.प्रसंगावधान राखत त्यांनी अस्वलाच्या हल्ल्यातून सुटका केली मात्र या हल्ल्यात त्यांच्या पाठीला व पायावर जखम झाली. उपचाराकरिता अहेरी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
घटनेची माहिती होताच माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस करून आर्थिक मदत केली.