आझादी का अमृत महोत्सव समारोह 2022 23" अंतर्गत आज दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोज शनिवारला सकाळी 11 वाजता लोक विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गांगलवाडी येथे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले .त्यामध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांच्या समस्या व उपाय योजना तसेच शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार उडीसा व महाराष्ट्र दोन्ही राज्यांच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवणारी वेशभूषा स्पर्धा व एन एम एम एस परीक्षेत पात्र उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समुपदेशक पदी एकात्मिक बाल विकास सेवा योजना तथा महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य च्या तज्ञ समुपदेशिका माननीय सौ गीताताई जांबुडे तसेच किशोरवयीन मुलांच्या शारीरिक भावनिक व सामाजिक घटकांमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल समुपदेशन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथील तज्ञ परिचारिका मान.वैशाली ठवरे मॅडम तद्वतच किशोरवयीन मुलांच्या जीवनात पडणारे चुकीचे पाऊल व त्यामुळे घडणारे गुन्हे व त्यावरील उपाय योजना या संबंधाने समुपदेशन करण्यासाठी लाभलेले ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान.रोशन यादव व सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमरे साहेब हे प्रामुख्याने उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना व कार्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.किशोरवयीन मुलांनी योग्य पोषण आहार व विहार केला तर मनात सुपीक विचार रुजतील.असा विचार जांभुळे मॅडम यांनी आपल्या समूपदेशनातून मांडला. इयत्ता आठ ते बाराच्या विद्यार्थ्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम , व्हाट्सअप यासारख्या सोशल मीडियाचा वापर न करता केवळ अँड्रॉइड मोबाईल चा उपयोग अभ्यासासाठीच करावा व आपल् आयुष्य उज्वल करावे.असे प्रतिपादन मुख्य समुपदेशक रोशन यादव ठाणेदार ,ब्रह्मपुरी यांनी केले.किशोरवयीन मुलांमध्ये बदल होणे स्वाभाविक आणि नैसर्गिक बाब असून त्याबाबत संकोचता न बाळगता पालक ,पाल्य व शिक्षक यांच्यात सुसंवाद घडत राहिला ;तर नक्कीच हा किशोरवयीन वादळाचा कालावधी आयुष्याला कलाटणी देऊन जाईलअसे मत प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथील तज्ञ परिचारिका कुमारी वैशाली ठवरे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे अध्यापक श्री पद्माकर रामटेके यांनी केले तर आयोजन व नियोजन मुख्याध्यापक श्री पी.वाय.शेंडे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले . समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे आभार मानले.