वाशिम जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षापासून वंचित शास्त्रीयदृष्ट्या दुर्लक्षित नाथ समाजाच्या मागण्यांकरिता लढा देत असलेल्या वैदर्भीय नाथ समाज संघ , संघटनेच्या लढ्याला अखेर यश आले . दि .13 ऑक्टोबर 2021रोजी मंत्रालयात ना . बच्चुभाऊ कडू यांच्या दालनात संबंधित प्रशासकीय अधिकारी यांचे सोबत झालेल्या बैठकीमध्ये वैदर्भीय नाथ समाज संघाच्यावतीने नाथपंथी, भराडी समाज बांधव यांना शासकीय ओळखपत्र तसेच व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा झाली होती. त्याची दखल घेऊन माननीय पालक मंत्री अकोला जिल्हा बच्चुभाऊ कडू यांनी दिनांक 4/4/ 22 रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन भवनात वैदर्भीय नाथ समाज संघांचे पदाधिकारी तसेच नाथ बांधव यांच्याशी झालेल्या नाथ समाजाविषयीच्या घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीमध्ये नाथजोगी समाजातील ज्यांची नावे यादी मधुन वगळण्यात आलेली होती, अशा कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात यावा तसेच नाथ जोगी समाजाच्या कुटुंबांना त्यांचे ज्या शासकीय जागेवर अतिक्रमणे आहेत ती विहित मर्यादेत नियमाकुल करण्याबाबत निर्देश दिले तसेच नाथपंथी भराडी समाज बांधव यांच्यावर गैरसमजुतीतून होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना संबंधित व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण ,प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र आणि विशेष म्हणजे व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हा नियोजन भवनात आयोजित या बैठकीला नाथ समाजाच्या वतीने , वाशिम जिल्ह्याच्या कारंजा [लाड] येथील, वैदर्भीय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार, अकोला जिल्हा समिती अध्यक्ष नागेशनाथजी जाधव,मुर्तिजापूर तालुका समिती अध्यक्ष योगेश तिहिले, वाशिम जिल्हा समिती उपाध्यक्ष रवीनाथ इंगळे ,अकोला जिल्हा समिती उपाध्यक्ष सदानंद चिलवंते,अकोला जिल्हा समिती उपाध्यक्ष विनोद चव्हाण,,नागेश इंगळे, नंदू खंदारे तसेच इतर नाथ बांधव व भगिनी उपस्थित होत्या. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचेशी बोलतांना कारंजा [लाड] येथील रहिवाशी असलेले वैदर्भिय नाथ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांनी कळवीले आहे .