अकोला- जीवनात कधी यश मिळते तर कधी अपयश,परंतू त्याचा विचार न करता अभ्यासाची वाटचाल सातत्त्याने सुरू असावी तरच यशाच्या दिशेने जाण्याचे सुलभ मार्ग मिळत राहतात असे प्रतिपादन एम.बी.बी.एस नंतर हृदयविकारांच्या अत्याधुनिक वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आपल्या प्रगल्भ बुध्दीमत्तेने अमेरिकन विद्यापीठात थेट प्रवेश मिळविण्यात यशस्वी झालेल्या डॉ विक्रम राजेश काटे यांनी केले. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा ४४ वा विचार मंथन मेळावा तथा सन्मान समारंभ स्थानिक जठार पेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये नुकताच संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.
युएसए मध्ये एम.एस साठी थेट प्रवेशाचा बहूमान मिळवून अकोल्याच्या वैभवात भर घातल्याच्या नेत्रदिपक यशाबद्दल त्यांना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यांचेसह तायकांडो राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कु साक्षी संघपाल किरतकार हिचा सुध्दा स्मृतिचिन्ह,शाल व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. पदोन्नती बद्दल विचारमंथन सभासद डॉ.अशोक तायडे,संघटनेत प्रभावी योगदानाबद्दल लोक स्वातंत्र्य राष्ट्रीय सहसचिव डॉ.अनुपकुमार राठी यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, राष्ट्रीय पदाधिकारी सौ.जया इंगोले,भारती यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्ष संजय देशमुख यांनी अध्यक्षिय भाषणातून संघटनेच्या संघर्षक वाटचालीची माहिती देऊन समाज आणि पत्रकारांना संघटीत होण्याचे आवाहन केले.
यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना वंदनज्-अभिवादन करण्यात आले.पहेलगाममधील अतिरेकी हल्ल्यातील बळी,शहिद जवान,महिला,शेतकरी,दिवंगत पत्रकार व आपत्ती तथा अपघातातील बळींना याप्रसंगी सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. अतिथींचा परिचय सचिव राजेन्द्र देशमुख यांनी प्रास्ताविक उपाध्यक्ष प्रदिप खाडे यांनी केले.
आशिष वानखडे पाटील यांच्या संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला अंबादास तल्हार,पुष्पराज गावंडे, गावंडे,प्रा.डॉ.संतोषकुमार हुशे, डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे, सुरेश पाचकवडे, प्रा.विजयराव काटे, के.व्ही.देशमुख सर, दिलीप नवले,वसंतराव देशमुख, सुरेश तिडके,नानासाहेब देशमुख,पंजाबराव वर,सागर लोडम,विजय देशमुख,बुढन गाडेकर, मनोहर मोहोड, शामबाप्पू देशमुख, अनिल मावळे,विजय देशमुख,गौरव देशमुख,शिवचरण डोंगरे,अनंतराव महल्ले, साहेबराव तायडे, अविनाश भगत, के.एम.देशमुख,सौ.सोनल अग्रवाल,स्वाती यादव, प्रशांत देशमुख, ए.बी. देशमुख,आर्या इंगळे, देवानंद किर्तनकार, डॉ.अशोक सिरसाट अॕड.संकेत देशमुख, मनोज देशमुख, आकाश सिरसाट,राजेन्द्र इंगळे,विजय बुरकुले,गजानन मुऱ्हे, उमेश शिंदे व अनेक पत्रकारांची उपस्थिती होती. आभारप्रदर्शन कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....