जुगनाळा ते रणमोचन मार्ग पूर्णत: उघडला असून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत शिवाय हा रस्ता पादाचारी सायकल स्वार शेतकरी शेतमजूरांना शेतीवर जाण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण होत आहे त्यासोबतच शाळेकरी मुले विद्यार्थिनी यांनासुद्धा रुई निलज किंवा किन्ही येथील शाळेत जाण्याकरीता सोयीचा नाही सदर मार्ग राष्ट्रीय महामार्गाला लागत असल्यामुळे बाजारपेठेत ब्रह्मपुरी किंवा आरमोरीसह इतर शालेय कामासाठी नागरिकांना उपयुक्त ठरत नसून सायकल स्वार मोटर सायकल अथवा इतर वाहने चालवण्याकरिता हा रस्ता पूर्णता निकामी झाला आहे गेल्या 20 वर्ष अगोदर या रस्त्याचे खडीकरण झाले होते वारंवार लोकप्रतिनिधींना सुद्धा या रस्त्या संदर्भात निवेदन देण्यात आले तरी परंतु आजता गायत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही सदर रस्ता मुख्य राष्ट्रीय महामार्गापासून जुगनाळा गावापर्यंत अवघे दोन किलोमीटर अंतर असतांना सुद्धा किन्ही वरून पाच किलोमीटर अंतर पार करत जुगनाळा येथे जावे लागत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना नाहकचा त्रास सहन करावा लागत आहे तर त्वरित या रस्त्याचे खडीकरण व दुरुस्ती करून डांबरीकरण करावे अशी मागणी जुगनाळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा उपसरपंच गोपाल ठाकरे यांनी केली आहे