बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्रीच्या सुमारास घडली. शहरालगत असलेल्या दुर्गापुरातील मेश्राम (45) महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात अजून दहशत पसरली आहे.
याआधी दोघांना बिबट्याने घरा जवळ येऊन ठार करत जंगलात घेऊन गेल्याच्या घटना ताज्या असतानाच महिलेला तिच्या घरा समोरच ठार केल्याने खळबळ उडाली. वनविभागाने या आधी एका नरभक्षक बिबट्याला जेल बंद केलं होते. आता वनविभाग काय पाऊल उचलतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.